Year Ender 2023: आता 2023 वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. 2023 मध्ये विश्वचषक (ICC World Cup 2023), आशिया चषक (Asia Cup 2023) आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपसह (WTC 2023) अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंडियन प्रीमियर लीग 2023 चाही (IPL 2023) समावेश करण्यात आला होता. आयपीएल 2024 चा (IPL 2024) लिलाव आता काही दिवसात होणार आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल 2023 च्या काही अनोख्या विक्रमांच्या तुमच्या आठवणी ताज्या करूया. यामध्ये भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. (हे देखील वाचा: Year Ender 2023: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'या' फलंदाजांनी 2023 मध्ये केल्या आहे सर्वाधिक एकदिवसीय धावा, येथे पाहा संपूर्ण यादी)
आयपीएल 2023 मध्ये मारले सर्वाधिक षटकार
आयपीएल 2023 मध्ये एकूण 1124 षटकार मारले गेले. आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतच्या कोणत्याही मोसमातील ही सर्वाधिक संख्या आहेत. तर 2022 बद्दल बोलायचे झाले तर या हंगामात 1062 षटकार मारले गेले.
सर्वाधिक अर्धशतके झळकावली
आयपीएल 2023 मध्ये 153 अर्धशतके झाली, जी कोणत्याही हंगामातील सर्वाधिक आहे. यापूर्वीचा विक्रम 2022 च्या आयपीएलमध्ये 118 धावांचा होता.
सर्वाधिक शतके
आयपीएल 2023 मध्येही सर्वाधिक शतके झळकावली होती. या मोसमात फलंदाजांनी एकूण 12 शतके झळकावली. कोणत्याही मोसमातील ही सर्वाधिक शतके आहेत.
सर्वात वेगवान अर्धशतक
21 वर्षीय यशस्वी जैस्वालने आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला. त्याने केवळ 13 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही फलंदाजाचे हे सर्वात जलद अर्धशतक आहे.
आयपीएल हंगामात सर्वाधिक 200+ धावा
आयपीएल 2023 मध्ये एकूण 37 वेळा, सर्व संघांनी 200+ धावा केल्या. हा आकडा कोणत्याही हंगामातील सर्वाधिक आहे.
सर्वोच्च 200 किंवा 200+ धावांचा पाठलाग
आयपीएल 2023 मध्ये, सर्व संघांनी 8 वेळा 200 किंवा त्याहून अधिक लक्ष्याचा पाठलाग केला आहे. हा आकडा जरी जास्त नसला तरी आयपीएलच्या कोणत्याही मोसमातील हा सर्वाधिक आहे.
सलग 5 चेंडूत 5 षटकार
आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना, रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये सलग 5 चेंडूत सिक्स मारणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याचवेळी, आयपीएलमध्ये शेवटच्या 5 चेंडूत 28 धावांचा पाठलाग करणारा तो पहिला फलंदाज आहे.