सुरेश रैना आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

“मैत्री ही एकमेव सिमेंट आहे जी जगाला एकत्र ठेवते,” वुड्रो विल्सन (Woodrow Wilson) यांचे हे विधान आजच्या काळात अगदी योग्य आहे. मैत्री ही अशी एक गोष्ट आहे जी जगाला राहण्यासाठी एक चांगले स्थान बनवते आणि क्रिकेटचे (Cricket) जग हे नक्कीच वेगळे नाही. काही क्रिकेटपटू लहानपणा पासूनच सर्वात चांगले मित्र असतात तर इतरांचे एकाच संघाकडून खेळताना जवळचे नाते निर्माण होते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मित्र/मैत्रिणीची जागा खूप खास असते. प्रत्येकजणाला मैत्री सोडून बाकीची नाती जन्मापासून मिळतात. मित्र/मैत्रीण हे असे नातं असतं जे आपण स्वतः निवडतो. हेच कारण आहे की प्रत्येकासाठी मैत्रीचे नाते खूप महत्वाचे आहे. मैत्रीची बरीच उदाहरणे तुम्ही बॉलिवूडमध्ये पाहिली असतील, ज्यात जय-वीरूचे नाव मैत्री हा शब्द क्लिक झाल्यावर सर्वात पहिले ऐकू येतो. पण केवळ बॉलिवूडच नाही तर क्रिकेट विश्वातही अशी अनेक मित्रांच्या जोड्या (Friendship in Cricket) आहेत ज्यांच्या कथा क्रिकेट चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहतील. (Friendship Day 2020: ही दोस्ती तुटायची नाय! मैदानावरील 'हे' 5 प्रतिस्पर्धी क्रिकेटर्स आहेत टीम इंडिया खेळाडूंचे खास मित्र)

खेळाडू वर्षानुवर्षे एकत्र खेळतात, लांब दौऱ्यावर एकत्र राहतात ज्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे नातं तयार होत. पण काही मैत्री अशा असतात की त्या सर्वांसाठी एक उदाहरण बनतात. तर आज, फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला 5 मित्रांच्या जोड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांची मैत्री इतरांसाठी उदाहरण आहे.

सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची जोडी भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी सलामी जोडी म्हणून ओळखली जाते. सचिन आणि सौरव जेव्हा-जेव्हा मैदानावर फलंदाजी करायचे तेव्हा दोन्ही खेळाडूंमध्ये परस्पर संबंध पाहायला मिळायचे. हेच कारण आहे की दोघेही महान क्रिकेटपटू होण्याखेरीज ते मैदानाबाहेरही एकमेकाचे खूप चांगले व जवळचे मित्र आहेत.हे फार कमी लोकांना माहित असेल, परंतु टीम इंडियामध्ये एकत्र खेळण्यापूर्वी ते एकमेकांना आधीच ओळखत होते. दादाने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, सचिनने भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी मी त्याला ओळखतो आणि तो सुरुवातीपासूनच अत्यंत खोडकर व्यक्ती आहे.

गौतम गंभीर-वीरेंद्र सेहवाग

सचिन-सौरवप्रमाणे गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग या सलामी जोडीनेही नाव कमावले आहे. दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियामध्ये येण्यापूर्वी दिल्लीकडून रणजी संघात एकमेकांसोबत बरेच क्रिकेट खेळले. हेच कारण आहे की दोघे वास्तविक जीवनात खूप चांगले मित्र आहेत. सेहवाग निवृत्त झाल्यावर गंभीर भावून झाला आणि म्हणाला की त्याचा एक भाग सेहवागबरोबर गेला. “सेहवागसारखा दुसरा खेळाडू कधी होणार नाही.”

एमएस धोनी-सुरेश रैना

जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट टीममधील मैत्रीची चर्चा होते तेव्हा सुरेश रैना आणि महेंद्र सिंह धोनीचा उल्लेख केला जातो. रैना आणि धोनीच्या मैत्रीचे उदाहरण संपूर्ण क्रिकेट विश्वात देतात. रैना आणि धोनी आता टीम इंडियामध्ये ड्रेसिंग रूम शेअर करत नाही, परंतु त्यांनी बराच काळ एकत्र क्रिकेट खेळला आहे. सध्या रैना-माही आयपीएलच्या फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जमध्ये खेळताना दिसतात.

रोहित शर्मा-शिखर धवन

टीम इंडियाची आणखी एक यशस्वी सलामी जोडी. रोहित आणि धवनची मैत्री कोणापासूनही लपलेली नाही. दोघांना एकमेकांचे चांगले मित्र मानले जाते आणि त्यांच्या मैत्रीचा निकाल मैदानावरील त्यांच्या खेळात दिसून येतो. दोघे एकत्र डावाची सुरुवात करतात आणि दोघांमध्ये मोठी आणि संस्मरणीय भागीदारी पाहायला मिळाल्या आहेत. सध्या रोहित-शिखरची जोडी सर्वात धोकादायक वनडे जोडी म्हणूनही पाहिली जात आहे.

हार्दिक पांड्या-केएल राहुल

मित्र फक्त आनंदातच नाही तर कठीण काळातही साथ देतात आणि हार्दिक-राहुलच्या जोडीने हे सिद्ध केले आहे. शंभर वादळातूनही त्यांची मैत्री अबाधित राहिली आहे. 'कॉफी विथ करण'चा 'तो' एपिसोड सर्वानाच परिचित असेल. वादग्रस्त टिप्पण्यांमुळे दोघांना बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला, पण दोन्ही खेळाडूंनी त्यांची मैत्रीवर संकट येऊ दिली नाही आणि आजही ते चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांच्या पोस्टवर मजेदार कमेंट करतानाही दिसतात.

इतर कोणत्याही खेळाप्रमाणेच क्रिकेटही बर्‍याच वर्षांतील काही वैयक्तिक स्पर्धा पहिल्या आहेत. पण, खेळ म्हणजे लोकांना एकत्र आणण्यासारखे आहे. आणि क्रिकेटमध्येही एकाच टीमकडून खेळताना काही खेळाडूंमध्ये स्पर्धा निर्माण होते, तर काहींचे सुदृढ संबंध निर्माण होतात. या फ्रेंडशिप डे निमित्त आमच्या कडून तुमहालाही 'फ्रेंडशिप डे'च्या शुभेच्छा!