Sachin Tendulkar | Photo Credits: Twitter

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खास शैलीने खेळणार्‍या सचिन तेंडुलकरने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना वेड लावलं होतं. मितभाषी आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाच्या या मास्टर ब्लास्टरने जगभरात मित्र देखील बनवले मात्र आज फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने त्याने बालपणीच्या मित्रांसोबतचा फोटो शेअर करत फ्रेंडशीप डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हा सूर्य मावळतीला जातो तेव्हा तुमच्या आजूबाजूला प्रकाश निर्माण करण्याची क्षमता मित्रांमध्ये असते. माझ्यासाठी प्रत्येक दिवस फ्रेंडशीप डे असतो असा आशयाचा मेसेज देणारं एक ट्वीट आणि बालपणीचा मित्रांसोबतचा फोटो सचिन तेंडुलकरने ट्वीट केला आहे.

सचिन तेंडुलकरचं बालपण सुरूवातीच्या काळात वांद्रे येथील साहित्य निवास मध्ये गेले. पुढे शिवाजी पार्कला तो काका-काकूंकडे रहायला आला. लहानपणापासूनच शिवाजीपार्क आणि रहिवासी इमारतींच्या ग्राऊंडवर तो मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यामध्ये रममान होत होता.

सचिन तेंडुलकर ट्वीट

भारतामध्ये ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा केला जातो. आज 2 ऑगस्ट ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार असल्याने देशभर तरूणाई सोशल मीडीयातून फ्रेंडशीप डे च्या शुभेच्छा देत मित्र मंडळींसोबत धम्माल करत आहे.