माजी क्रिकेटपटू मृणांक सिंग (Mrinank Singh Arrested ) याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो आपण आयपीएस अधिकारी (Impersonating IPS Officer) असल्याचे सांगायचा. तसेच, आयपीएलमध्ये एका संघाचा भाग असल्याचा दावाही तो करत असे. त्याने अनेकांना गंडा घातला आहे. त्यामुळे पाठिमागील अनेक काळापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर तो दिल्ली येथील चाणक्यपुरी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याला ताज पॅलेस हॉटेल नवी दिल्ली (New Delhi Taj Palace Hotel) येथून फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. विशेष म्हणजे तो हरियाणा अंडर-19 क्रिकेट संघाकडून खेळत असे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघाचे प्रतिनिधित्व केल्याचा तो अनेकांजवळ दावाही करत असे.
मृणांक सिंह यास दिल्ली पोलिसांकडू अटक
मृणांक सिंह यास दिल्ली पोलिसांनी अटक केली असून तपास सुरु आहे. त्याची चौकशी केली जात असून इतरही अनेक गुन्ह्यांची त्याच्याकडून उकल होण्याची शक्याता व्यक्त होत आहे. या आधी त्याने टीम इंडियातील खेळाडूंनाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. आरोपीने स्वत:ची ओळख वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून करुन देत अनेक महागड्या हॉटेल्समध्ये मुक्काम ठोकला. त्याने अनेक आलिशान हॉटेल मालक आणि व्यवस्थापकांची फसवणूक केली. एक प्रसिद्ध क्रिकेटरही या फसवणुकीचा बळी ठरला आहे. त्याने तोतयागिरी करत इतरही अनेकांना फसविल्याचा पोलिसांना संशय आहे. (हेही वाचा, Intelligence Bureau: आयबीचा अधिकारी शिवसेना आमदाराच्या घरी धडकला; तोतया बिंग फुटताच पोलिसांच्या जाळ्यात सापडला, जाणून घ्या काय आहे प्रकार?)
आरोपीकडून हॉटेल ताज पॅलेसमध्ये मुक्काम
पोलिसांनी सांगितले की, मृणाक सिंग नावाच्या व्यक्तीने स्वतःला क्रिकेटर म्हणून सादर केले. 22 जुलै 2022 ते 29 जुलै 2022 या कालावधीत हॉटेल ताज पॅलेसमध्ये मुक्काम केला. आरोपींने 5,53,362 रुपयांचे बिल न भरता हॉटेल सोडले. जेव्हा त्याला पैसे मागितले गेले तेव्हा त्याने सांगितले की आपली कंपनी आदिदासला पैसे देईल आणि त्यानुसार हॉटेलचे बँक स्टेटमेंट त्यांच्याशी शेअर केले गेले. हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितले की, आपण त्याच्या ड्रायव्हरला देय रक्कम भरण्यासाठी रोख रकमेसह पाठवत आहोत. प्रत्यक्षात मात्र कोणीही हॉटेलवर पोहोचले नाही. (हेही वाचा, HC On Fake Sports Certificates: बोगस प्रमाणपत्रे वापरून क्रीडा कोट्यातून नोकरी मिळवणाऱ्या राज्य सरकारी 2 कर्मचाऱ्यांची बडतर्फ कायम; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय)
थकबाकी भरण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाने त्याच्याशी अनेकवेळा संपर्क साधला. मात्र प्रत्येक वेळी त्यांने खोटी विधाने व आश्वासने दिली व नेहमी चुकीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, CRPC च्या कलम 41A अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली. यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. अटक करण्यासाठी लुक आऊट परिपत्रकही जारी करण्यात आले होते. अखेर त्याला अटक झाली.