Sachin Tendulkar-Rahul Dravid: 'राहुल द्रविडच्या खेळाने अनेकदा सचिनला तेंडुलकरलाही झाकून टाकलं,' पाकिस्तानी क्रिकेटपटूने सचिन-द्रविडची तुलना करत केले महत्वाचे विधान
सचिन तेंडुलकर-राहुल द्रविड (Photo Credit: Instagram/Facebook)

भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली, राहुल द्रविड (Rahul Dravid), वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीस लक्ष्मणसारखे धडाकेबाज खेळाडू होऊन गेले. हे खेळाडू खेळत असताना टीम इंडियाने (Team India) अनेक संस्मरणीय विजय मिळवले आहेत. सचिन-सेहवागची नेहमी तुलना केली गेली. तसंच द्रविड आणि लक्ष्मणमधेही तुलना केली जायची. पण सचिन आणि द्रविडच्या फलंदाजीची तुलना फार कमी वेळा केली गेली. पाकिस्तानचा माजी फलंदाज रमीझ राजाने (Ramiz Raja) राहुल द्रविडच्या कारकीर्दीची आठवण करुन दिली आणि ती टिकवून ठेवल्याबद्दल आणि संघात सचिनसारखे कोणी असले तरी स्वत:साठी नाव कमावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. “राहुल द्रविड हा सचिन तेंडुलकर जितका हुशार नव्हता, परंतु एखाद्या महान क्रिकेटपटूविरुद्ध टिकून राहण्यासाठी आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी खूप काही लागत नाही. आपणास माहित आहे की आपण सर्वोत्कृष्ट प्रयत्न केला आहे जो संघातील सर्वोत्कृष्ट फलंदाज होण्याइतके चांगले आहे,” Sportskeedaने राजाचे म्हणणे उद्धृत केले. ('सचिन तेंडुलकरकडे कौशल्य होतं पण शतकाचे दुहेरी, तिहेरीत रूपांतर करायचे माहित नव्हतं,' माजी वर्ल्ड कप विजेता कपिल देव यांनी मांडले परखड मत)

“पण खेळाने अनेकदा सचिनलाही झाकून टाकण्याबद्दल द्रविडला श्रेय दिले पाहिजे. तो खडतर खेळपट्टीवर अत्यंत चांगला फलंदाज होता कारण त्याचा बचाव ठोस होता. त्यामुळेच तिसऱ्या क्रमांकावर तो यशस्वी ठरला”, असे राजा पुढे म्हणाले. “द्रविडचा सर्वानाच आदर वाटतो. ड्रेसिंग रूममधून एखाद्या खेळाडूच्या महानतेचा निर्णय केला जातो. जर संघाला असे वाटत असेल की तो 30 किंवा 50 च्या बाबतीत कठोर परिस्थितीत त्यांना सोडणार नाही, तर तेच महत्त्वाचे आहे,” राजा पुढे म्हणाला. काही दिवसांपूर्वी विस्डनच्या एका पोलमध्येदेखील चाहत्यांनी सचिनऐवजी द्रविडला पसंती दर्शवली होती.

द्रविडने भारताकडून 164 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 52.31 च्या सरासरीने 13,288 धावा केल्या आहेत. त्याने 344 एकदिवसीय सामनेही खेळले ज्यात 39.16 च्या सरासरीने त्याने 10,889 धावा केल्या आहेत.