माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन; सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, मोहम्मद कैफ, वसीम जाफर, यांच्यासह दिग्गजांकडून खास ट्वीट च्या माध्यमातून श्रद्धांजली
Madhav Apte (Photo Credit: Twitter)

आज शुक्रवारी मुंबईच्या (Mumbai) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) भारताचे पूर्व क्रिकेटर माधव आपटे (Madhav Apte) यांचे पहाटे 6 वाजता निधन झाले आहे. माधव आपटे याच्या काही खास आठवणी शेअर करत सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), मोहम्मद कैफ (Mohammad Kaif), रवी शास्त्री (Ravi Shastri) विनोद कांबळी (Vinod Kambli), वसीम जाफर (Wasim Jaffer) यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. माधव आपटे हे भारतीय संघातील अतिशय लोकप्रिय खेळाडू होते. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनीही सोशलमीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

ट्विट-

माधव आपटे यांच्या निधनाची बातमी ऐकून दु: खी झालो. महान कथा सांगणारे आणि 71 वर्षांचे होईपर्यंत क्रिकेट खेळणारे माधव आपटे यांच्या आत्म्याला शांती मिळू ईश्वरचरणी हीच प्राथना- मोहम्मद कैफ

कसोटी सामन्यात पुरेशी संधी मिळाली नसूनही त्यांची सरासरी 50 आहे. वयाचे 71 वर्षाचे होईपर्यंत ते क्रिकट खेळले. मुंबई आणि भारतीय संघाकडून उत्तम कामगिरी बजावणारे माधव सर नेहमी आठवणीत राहतील- वसीम जाफर

माधव आपटे यांच्या निधनाची बातमी कानावर पडल्यानंतर शब्दच सुचेना झाले. मी लहान होतो, तेव्हापासून त्यांना ओळखतो. तसेच महत्वाचे निर्णय घेण्यासाठी मी त्यांचे मत घेत असे. त्यांनी नेहमीच मला प्ररित केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मला चांगले काम करण्यास प्रवृत्त केले आहे- विनोद कांबळी

माधव आपटे सरांच्या आजही प्रेमळ आठवणी स्मरणात आहेत. मी 14 वर्षाचा असताना शिवाजी पार्कवर त्यांच्या विरोधात खेळायला गेलो होतो. त्यांनी मला नेहमीच साथ दिली आहे. त्यांनी मला 15 वर्षाचा म्हणून सीसीआयसाठी खेळण्याची संधी दिली होती. त्यांच्या आत्म्याला शांतता लाभो- सचिन तेंडुलकर

माधव आपटे यांची गुरू अशीच ओळख निर्माण झाली होती. त्यांनी जात, धर्म, लिंग, गरीब-श्रीमंत या भेदांपलीकडे जाऊन अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. त्यांचा स्वभावही खिलाडूवृत्तीचा होता. त्यामुळे क्रिकेटपासून ते उद्योग क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार होता. माधव आपटे एका खेळाडू बरोबर यशस्वी उद्योजक म्हणूनही ते परिचित होते.