भारतीय क्रिकेटर युसूफ पठाण (Photo Credit: PTI)

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणचा (Yusuf Pathan) कोरोना विषाणूचा (Coronavirus) अहवाल सकारात्मक आला आहे. युसुफ पठाणने स्वत: ट्विटरच्या माध्यामातून ही माहिती दिली आहे. याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) कोरोनाची लागण झाली होती. नुकतीच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी-20 स्पर्धेत हे दोघेही इंडिया लेजेन्ड संघाकडून खेळले होते. या स्पर्धेत अनेक भारतीय माजी खेळाडूने सहभाग घेतला होता. यामुळे इंडिया लेजेन्ड संघातील अन्य काही खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे.

“माझा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. अहवाल आल्यानंतर मी स्वत: ला माझ्या घरात क्वारंटाईन केले आहे आणि मी सर्व आवश्यक पावले उचलत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी", असे आवाहन युसूफ पठाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. हे देखील वाचा- Sachin Tendulkar Corona Positive: सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण, घरीच होम क्वारंटाइन राहणार

ट्वीट-

सध्या संपूर्ण देशात कोरोनाचे संकट गडद होताना दिसत आहे. दरम्यान, राजकीय नेते, खेळाडू, कलाकारांसह सर्वसामन्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.