T20 World Cup 2021: मोठ्या पराभवानंतरही माजी भारतीय दिग्गज फलंदाजाने ‘या’ संघावर टी-20 विश्वचषक जेतेपदासाठी लावला दाव
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) सराव सामन्यात टीम इंडियाने (Team India) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करेल असे अपेक्षित होते. पण टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून 10 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. यानंतर मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (New Zealand) 5 विकेट्स राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठण्याची दावेदारी आणखी मजबूत केली आहे. पण टीम इंडिया टी-20 विश्वचषक जेतेपद जिंकू शकते, असा विश्वास भारताचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) व्यक्त केला आहे. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभवानंतरही सेहवागने कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियावर त्यांनी विश्वास दाखवला आहे. (T20 World Cup 2021 जेतेपदासाठी इंग्लंड फेव्हरिट? बांगलादेशच्या पराभवानंतर वसीम जाफर-Michael Vaughan यांच्यात रंगली धमाल ‘थट्टामस्करी’!)

वीरेंद्र सेहवागने त्याच्या फेसबुक शो Veerugiri.com वर सांगितले की, “माझ्या मते हा टी-20 विश्वचषक फक्त टीम इंडियाच जिंकेल. त्यांना इथे चांगले क्रिकेट खेळायचे आहे. आमचा संघ जेव्हा जिंकतो तेव्हा आम्ही नेहमी आनंदी असतो पण जेव्हा तो हरतो तेव्हा आम्हाला अधिक समर्थन करावे लागते. त्यामुळे भारत टी-20 विश्वचषक जिंकू शकेल, असा माझा विश्वास आहे.” पाकिस्तान कर्णधार बाबर आजमने पहिले गोलंदाजी करण्यास सांगितल्यानंतर भारत 20 षटकांत 7 बाद 151 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात पाकिस्तान सलामीवीर बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांनी अनुक्रमे 79 (नाबाद) आणि 68 (नाबाद) धावा करून संघाला मोठा विजय मिळवून दिला. यानंतर पाकिस्तानने मंगळवारी त्यांच्या दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला, त्यामुळे उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांपैकी एक बनण्याचा दावा मजबूत केला.

पाकिस्तानबद्दल बोलताना भारताचा माजी सलामीवीर म्हणाला, “या विजयामुळे पाकिस्तानची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता जवळजवळ निश्चित आहे कारण त्यांचे उर्वरित सामने  आता अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. त्यांनी त्यांचे पुढचे दोन सामने जिंकले तरी ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील,” त्याने अखेरीस म्हटले. दरम्यान, भारत पुढील सामन्यात 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडशी भिडणार आहे. दोन्ही संघांसाठी हा आर-पारचा असणार आहे. सेमीफायनल फेरीत प्रवेश करण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे.