T Nataranjan कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर Michael Vaughan यांनी BCCI ला मारला टोला, म्हणाले - ‘मँचेस्टर टेस्टप्रमाणे आयपीएल रद्द...!’
माइकल वॉन (Photo Credit: Instagram)

T Nataranjan Tests COVID-19 Positive: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजन (T Nataranjan) कोविड-19 पॉझिटिव्ह आढळला आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे की, आज रात्री दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यावर त्याचा परिणाम होणार नाही. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर येताच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू माइकल वॉन (Michael Vaughan) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून बीसीसीआयला टोला मारला. वॉनने बीसीसीआयची (BCCI) फिरकी घेतली आणि ट्विट केले की पाहूया की आयपीएल देखील शेवटच्या टेस्टप्रमाणे रद्द होईल की नाही. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापुर्वी भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात होती. पाचवा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये (Manchester) खेळला जाणार होता, पण त्याआधीच संघाचे फिजिओची कोविड-19 चाचणी सकारात्मक आढळली आणि पाचवी कसोटी याच कारणामुळे रद्द करण्यात आली. (IPL 2021 वर पुन्हा कोरोनाचे सावट, दिल्लीविरुद्ध लढतीपूर्वी SRH चा T Natarajan कोविड-19 पॉझिटिव्ह; संपर्कात आलेले सहा जण आयसोलेट)

वॉन यांनी तेव्हा देखील बीसीसीआयला टार्गेट केले होते की हे सर्व इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लक्षात घेऊन केले गेले आहे. कोविड-19 चाचणीत नटराजन पॉझिटिव्ह आल्यानंतर वॉनने ट्विटरवर लिहिले, “शेवटच्या टेस्टप्रमाणे IPL रद्द होते का ते पाहूया !!!!! मी हमी देतो की ते होणार नाही.” डावखुरा वेगवान गोलंदाज नटराजन, जो गुडघ्याच्या शस्त्रक्रियेने पुनरागमन करत आहेत, त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्या अष्टपैलू विजय शंकरसह सहा जणांना अलगावमध्ये पाठवण्यात आले आहे. बीसीसीआयने दिलेल्या निवेदनानुसार, “सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू टी नटराजन आरटी-पीसीआर चाचणीमध्ये कोविड-19 पॉझिटिव्ह आला आहे. खेळाडूने स्वतःला उर्वरित संघापासून वेगळे केले आहे आणि अद्याप कोणतीही लक्षणे नाहीत. उर्वरित संघाची आरटी-पीसीआर चाचणी आज सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी 5 वाजता घेण्यात आली, ज्यात जवळच्या संपर्कांचाही समावेश आहे. प्रत्येकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.”

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री आणि काही सपोर्ट स्टाफची कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयला भारत विरुद्ध इंग्लंड मँचेस्टर कसोटी सामना रद्द करावी लागली होती. त्यामुळे इंग्लंडचे अनेक माजी क्रिकेटपटू संतापले आहेत. तेव्हा भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर होता. यामुळे इंग्लंडचे अनेक माजी क्रिकेटपटू संतापले आणि भारतीय संघ व बीसीसीआयवर टीका केली. या यादीत वॉनचाही समावेश होता. मात्र, दोन्ही मंडळांनी हे प्रकरण संयुक्तपणे निकाली काढले. मात्र आताही इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंचे वक्तृत्व सुरू आहे.