Photo Credit- X

Rishi Sunak Mumbai Visit: माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी रविवारी दक्षिण मुंबईतील पारसी जिमखान्याला (Parsee Gymkhana) भेट दिली. तिथे त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला. इतकेच नाही तर त्यांनी सोशल मीडियावर क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला. पोस्टला त्यांनी कॅप्शन दिले की, 'टेनिस बॉल क्रिकेट खेळल्याशिवाय मुंबईचा कोणताही प्रवास पूर्ण होत नाही.' असे ते म्हणाले. 'भविष्य इथेच बघायचं आहे. मी 10 विकेट्स घेईन. मी अनेक वेळा बाद होण्यापासून स्वतःला वाचवलं.' असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

'पारसी जिमखाना क्लबच्या वर्धापन दिन सोहळ्यात सर्वांसोबत असणे खूप छान होते", अशा आणखी भेटींसाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. 25 फेब्रुवारी 1885 रोजी जमशेदजी टाटा हे अध्यक्ष असताना पारसी जिमखान्याची स्थापना झाली होती.

ऋषी सुनक

ऋषी सुनक ब्रिटनचे माजी पंतप्रधान

ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान राहिले आहेत आणि ते कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आहेत. जुलै महिन्यात झालेल्या ब्रिटिश निवडणुकीत लेबर पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला. त्यांनी आपली जागा जिंकण्यात यश मिळवले पण सरकार स्थापन करण्यात त्यांना अपयश आले.