चॅपल यांची (Photo Credit: Telegraph Sport/Twitter)

ऑस्ट्रेलिया (Australia) चे माजी कर्णधार आणि सध्याच्या क्रिकेट विश्वातील चांगल्या समालोचकांपैकी एक इयान चॅपल (Ian Chappell) यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. 75 वर्षीय चॅपेल यांनी स्वतः आपल्याला हा जीवघेणा रोग झाल्याची माहिती दिली आहे. 1964 आणि 1980 च्या दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी 75 कसोटी खेळणारे चॅपेल यांच्यावर पाच आठवड्या पूर्वी रेडिएशन थेरपी करण्यात आली होती. द डेली टेलीग्राफच्या अहवालानुसार चॅपेल यांना खांदा, मान आणि अंडर-आर्म या भागात स्किन कॅन्सर (Skin Cancer) आहे. दरम्यान, चॅपेल म्हणाले की ते थेरेपी शिवाय सर्व काम करू शकतात आणि लवकरच रोगातून बरे होऊन ऑगस्ट मध्ये सुरु होणाऱ्या इंग्लंड (England)-ऑस्ट्रेलिया मधील अॅशेस (Ashes) सिरीजमध्ये समालोचन करण्यास येतील. (ENG vs AUS, Ashes 2019: डोक्याला दुखापत झाल्यास सबस्टिट्यूट खेळाडूला ही बॅटिंग! अॅशेस पासून नियम लागू होण्याची शक्यता)

आपल्याला कर्करोग झाल्याची माहिती देताना चॅपेल म्हणाले, "मी सर्व लोकांना माहिती दिली नाही कारण मला माहिती नव्हते की रेडिएशन ठरेपी कशी होईल. पण आता थेरेपी सुरु झाली आहे आणि मला जास्त त्रास होत नाही. रात्री थोडा थकवा जाणवतो, थोडी चिडचिड देखील होते पण बाकी सर्व ठीक आहे. सांगायचे झालं तर चॅपेल यांनी रेडिओथेरपी दरम्यान ही काम सुरु ठेवले होते.

चॅपेल म्हणाले की रोगाचे निदान झाल्याचे कळताच ते घाबरून गेले होते पण त्यांना त्यांच्या आईची आठवण केली आणि ज्याने त्यांना या रोगाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. चॅपल यांची गणना कसोटी इतिहासातील महान कर्णधारांमध्ये केली जाते. चॅपल यांनी 75 कसोटीत सामन्यात 42.42 च्या सरासरीने 5345 धावा केल्या आहेत आणि त्यांची चपलता आणि क्षमता कोट्याही शब्दात परिभाषित केले जाऊ शकत नाही.