विराट कोहली (Photo Credit: @BCCI/Twitter)

फोर्ब्स (Forbes) मासिकाच्या वार्षिक 100 सेलेब्रींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने बॉलिवूडचा स्टार सलमान खान याला मागे टाकत फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 यादीमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारा विराट हा पहिला क्रिकेटपटू ठरला. गेल्या वर्षी दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या कोहलीने बीसीसीआयची (BCCI) मॅच फी, एंडोर्समेंट आणि इन्स्टाग्राम पोस्टद्वारे 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान 252.72 कोटी रुपये कमावले. भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने पाचवे स्थान कायम राखले आहे. 2014  च्या उत्तरार्धात कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही आणि विश्वचषकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातनंतर भारतासाठी न खेळताना धोनीने 136 कोटी रुपये आणि अनेक ब्रँड अ‍ॅन्डोर्समेंटची कमाई केली आहे. गेल्या वर्षीही धोनीने 228.09 कोटी रुपयांची कमाई तेच स्थान मिळवले होते.

कोहली आणि धोनीव्यतिरिक्त मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने गेल्या वर्षीपासून नववे स्थान कायम राखून टॉप -10 मध्ये स्थान मिळवले आहे. त्याची कमाई तीन कोटींनी कमी झाली आहे पण 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या माजी भारतीय फलंदाजाने जवळपास  77 कोटींची कमाई करुन आपली ब्रँड व्हॅल्यू कायम राखली आहे. रोहित शर्मा पहिल्या 10 मध्ये नाही परंतु त्या बाहेरील प्रथम क्रमांक मिळवले असून तो 11 व्या स्थानी आहे. दुसरीकडे, महिलांबद्दल बोलायचे झाले तर पीव्ही सिंधू, सायना नेहवाल, एमसी मेरी कॉम, मिताली राज, स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनीदेखील 'फोर्ब्स' 100सेलिब्रिटींच्या यादीत स्थान मिळवले आहे.

यावर्षी दोन महिला बॉलीवूड सेलिब्रिटींनी या यादीत पहिल्या दहायामध्ये प्रवेश केल्याचे पहिल्यांदा पाहायला मिळाले. यामध्ये आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांचा समावेश आहे. या यादीत अक्षय कुमार दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचे एकूण उत्पन्न 293.25 कोटी आहे. सलमानने 229.25 कोटींची कमाई केली. यावर्षी त्याचा फक्त 'भारत' हा चित्रपट प्रदर्शित केला.