Bengaluru Blasters vs Hubli Tigers Match 3-3 Super Over: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या अनेक स्पर्धा खेळल्या जात आहेत. काही राज्यांमध्ये टी-20 लीग देखील आयोजित केल्या जात आहेत ज्यात महाराजा टी-20 ट्रॉफीचा (Maharaja T20 Trophy) समावेश आहे. या लीगमध्ये एक अनोखा सामना पाहायला मिळाला. या सामन्यात 1 किंवा 2 नव्हे तर एकूण 3 सुपर ओव्हर खेळल्या गेल्या, आणि त्यानंतर सामन्याचा निकाल लागला. हा सामना बंगळुरू ब्लास्टर्स आणि हुबळी टायगर्स (Bengaluru Blasters vs Hubli Tigers) यांच्यात खेळला गेला. हुबळी टायगर्सची कमान मनीष पांडे (Manish Pande) यांच्या हाती आहे. त्याचवेळी बंगळुरू ब्लास्टर्स संघ मयंक अग्रवालच्या (Mayank Agrawal) नेतृत्वाखाली खेळत आहे.
एकाच सामन्यात 3 सुपर ओव्हर
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी केली. हुबळी टायगर्स संघ 20 षटकात 164 धावा करत सर्वबाद झाला. यानंतर बेंगळुरू ब्लास्टर्सने फलंदाजी केली, पण बेंगळुरू ब्लास्टर्सने 20 षटकांत 164 धावा करून सर्वबाद झाला. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली, जेणेकरून सामन्याचा निकाल लावता येईल. सुपर ओव्हरमध्ये बंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 1 गडी गमावून 10 धावा केल्या. अशा स्थितीत हुबळी टायगर्सला विजयासाठी 11 धावा करायच्या होत्या, पण हुबळी टायगर्स संघाला 10 धावाच करता आल्या.
पाहा व्हिडिओ
Friday night frenzy at the @maharaja_t20: Not one, not two, but THREE Super Overs were needed for Hubli Tigers to finally win against Bengaluru Blasters 🤯🤯🤯#MaharajaT20onFanCode #MaharajaTrophy #MaharajaT20 pic.twitter.com/ffcNYov1Qf
— FanCode (@FanCode) August 23, 2024
(हे देखील वाचा: WI vs SA 1st T20I Live Streaming: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार टी-20 चा थरार! शनिवारी पहिला सामना; कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून)
तिसऱ्या सुपर ओव्हरला हुबळी टायगर्सचा झाला विजय
पहिला सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर हुबळी टायगर्सने प्रथम फलंदाजी करत दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये 8 धावा केल्या. मात्र 9 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना बंगळुरू ब्लास्टर्स संघ 1 गडी गमावून केवळ 8 धावा करू शकला. अशा स्थितीत हा सामना तिसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. तर तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बंगळुरू ब्लास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 1 गडी गमावून 12 धावा केल्या. यावेळी हुबळी टायगर्स संघाने 13 धावा केल्या आणि सुपर ओव्हरमध्ये बेंगळुरू ब्लास्टर्सचा पराभव करून सामना जिंकला.
सुपर ओव्हरचा काय आहे नियम?
2008 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर सुरू करण्यात आली होती. दोन्ही संघांचे गुण समान असताना सुपर ओव्हरचा वापर केला जातो. ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये 1-1 षटकांचा सामना खेळला जातो. जर सुपर ओव्हर देखील बरोबरीत असेल, तर सुपर ओव्हर पुन्हा एकदा खेळला जातो आणि निकाल घोषित होईपर्यंत असेच चालू राहते. मात्र, सुपर ओव्हरमध्ये काढलेल्या धावा आणि विकेट या रेकॉर्डमध्ये जोडल्या जात नाहीत.