WI vs SA 1st T20I Live Streaming: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार टी-20 चा थरार! शनिवारी पहिला सामना; कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून
WI vs SA: वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलकडे असेल. तर एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बार्बाडोस येथे टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
West Indies Cricket Team vs South Africa National Cricket Team: कसोटी मालिकेनंतर, वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (West Indies Cricket Team) आणि दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ (South Africa National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना शनिवारी 24 ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या (Trinidad) ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडेबारा वाजता दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जाईल. वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलकडे असेल. तर एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बार्बाडोस येथे टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमान असूनही वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नाही.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्याला रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 12 वाजता टॉस होईल. तसेच दोन्ही देशामधील टी-20 मालिका भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर चाहत्यांना हा सामना मोबाईलवर फॅन कोड एपवर पाहायला मिळेल.
After a hard-fought Test series, the Windies will now take on the Proteas in a 3-match T20 series! 💥
Watch the 1st T20I tonight at 12:30 AM, LIVE on #FanCode!#WIvSAonFanCode pic.twitter.com/Hhr5A3NXMN
— FanCode (@FanCode) August 23, 2024
टी-20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 24 ऑगस्ट, त्रिनिदाद
दुसरा सामना, 25 ऑगस्ट, त्रिनिदाद
तिसरा सामना, 28 ऑगस्ट, त्रिनिदाद
दोन्ही संघाचे खेळाडू
वेस्ट इंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), ॲलिक अथानाझे, फॅबियन ॲलन, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमॅरियो शेफर्ड.
दक्षिण आफ्रिका: एडन मार्रक्रम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, क्वेना माफाका, विआन मुल्डर, लुंगी एन्गिडी, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, रस्सेन ड्यूसेन आणि लिझाद विल्यम्स.
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 06:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

