IND vs AUS 4th T20 Pitch Report: रायपूरच्या मैदानावर पहिल्यांदाच होणार टी-20 आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या कसा असेल खेळपट्टीचा अहवाल
Team India (Photo Credt - Twitter)

IND vs AUS 4th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील टी-20 मालिकेतील चौथा सामना 1 डिसेंबर रोजी रायपूर (Raipur) येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Shaheed Vir Narayan Singh International Stadium) होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. एकीकडे हा सामना जिंकून अजेय आघाडी घेण्याचे भारताचे लक्ष्य असेल, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधायची असेल. रायपूरच्या मैदानावर फलंदाज किंवा गोलंदाज कोणाल मिळणार मदत, हवामान कसे असेल, स्टेडियमची आकडेवारी कशी असेल. या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th T20: चौथ्या टी-20 साठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन संघ रायपूरला पोहोचले, पाहा व्हिडिओ)

रायपूरमध्ये फक्त खेळला गेला आहे एक वनडे सामना

रायपूरच्या मैदानावर आतापर्यंत फक्त एक वनडे सामना खेळला गेला आहे. त्या सामन्यात भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा संघ 108 धावांत सर्वबाद झाला होता. यानंतर टीम इंडियाने 2 विकेट्स राखून हे लक्ष्य सहज गाठले. या मैदानावर आयपीएल आणि चॅम्पियन्स टी-20 लीगचे अनेक सामने खेळले गेले आहेत.

कशी आहे रायपुरची खेळपट्टी?

रायपूरच्या मैदानावर 6 आयपीएल सामने आणि 8 चॅम्पियन्स टी-20 लीग सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये फक्त एकदाच असे घडले आहे की एखाद्या संघाने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल, अशी पूर्ण आशा आहे. दुसऱ्या डावात ही खेळपट्टी संथ होते, त्यामुळे या खेळपट्टीवरून फिरकीपटूंना मदत मिळते. पण पाठलाग करणार्‍या संघाला थोडे सोपे होऊ शकते, कारण नंतर दवकाळात गोलंदाजी करणे कठीण होते. त्यामुळे नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरते.

कसे असेल हवामान ?

1 डिसेंबर रोजी रायपूरमधील हवामानाचा अहवाल पाहिला तर संध्याकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, खेळादरम्यान कमाल तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सामन्याच्या दिवसापूर्वी पाऊस पडत असला तरी सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे चाहत्यांना या सामन्याचा पुरेपूर आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येण्याची शक्यता नाही.