
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे खेळतील. अलीकडेच विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून सहावे विजेतेपद पटकावले. या सामन्याच्या दिवशी विशाखापट्टणमचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया. (हे देखील वाचा: IND vs AUS 1st T20 2023 Live Streaming: आजपासुन भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 'टी-20'चा थरार, कधी, कुठे पाहणार सामना? घ्या जाणून)
कसे असेल हवामान?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 23 नोव्हेंबरला दुपारी विशाखापट्टणम आणि त्याच्या आसपासच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6, दुपारी 2 आणि 5 या वेळेत पाऊस पडू शकतो. आनंदाची बातमी म्हणजे सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस थांबण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 7 ते 10:30 या वेळेत सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सामन्यापूर्वी पाऊस पडल्यास नाणेफेकीला उशीर होऊ शकतो.
विशाखापट्टणम खेळपट्टी अहवाल
एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली मानली जाते, परंतु या खेळपट्टीवर झालेल्या तीन टी-20 सामन्यांवर नजर टाकली तर आतापर्यंत या फॉरमॅटमध्ये गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. 2016 मध्ये येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 मध्ये श्रीलंकेचा संघ अवघ्या 82 धावांत ऑलआऊट झाला आणि भारताने हा सामना सहज जिंकला. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी 7 विकेट घेतल्या होत्या.
दोन्ही संघांचे पूर्ण पथक
भारताचा टी-20 संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग , प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर (केवळ शेवटचे दोन सामने)
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झांपा