आयसीसी वनडे विश्वचषक 2023 संपल्यानंतर आजपासुन म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना विशाखापट्टणम येथे संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेकडे टीम इंडियाच्या 2024 टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या टी-20 मालिकेसाठी संघाची कमान स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तुम्ही जियो सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तुम्ही स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. (हे देखील वाचा: IND vs AUS Final: फायनलमध्ये Travis Head ने क्लीन कॅच न घेतल्याने Rohit Sharma नाबाद असल्याचा यूट्यूबवर दावा; ICC ने केली भारत-ऑस्ट्रेलिया रिमॅचची घोषणा? जाणून घ्या सत्य)
Get ready to cheer #TeamIndia in the shortest form of the game 😍
Watch 🇮🇳 take on 🇦🇺 in the 1️⃣st T20I of #IDFCFirstBankT20ITrophy, LIVE from 6 PM on #JioCinema, #Sports18, & #ColorsCineplex 🙌#JioCinemaSports #INDvAUS pic.twitter.com/M77MxpL599
— JioCinema (@JioCinema) November 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)