फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) ने सोमवारी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधारपदाचा राजीनामा दिला. दक्षिण आफ्रिका क्रिकेट (Cricket South Africa) मंडळाने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध मर्यादित शतकारांच्या मालिके संघाची जबाबदारी क्विंटन डी कॉक याच्याकडे दिली होती. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 मालिकेतही डी कॉकने संघाचे नेतृत्व केले, तर डु प्लेसीला संघातून विश्रांती दिली होती. सीएसएने (CSA) सोशल मीडियावर ही घोषणा केली आणि पोस्टमध्ये लिहिले, “फाफ डु प्लेसिस यांनी जाहीर केले आहे की तो प्रोटीस कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार म्हणून त्वरित आपल्या भूमिकेतून बाहेर पडत आहे." दक्षिण आफ्रिकेला डू प्लेसीच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेत 1-3 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. डु प्लेसीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कामगिरी काही काळ खराब राहिली. (Video: 'वंडर वूमन'लाही कोरोनाव्हायरस चिंता? दक्षिण आफ्रिकी फॅनने इंग्लंडविरुद्ध सेंचुरियन टी-20 मॅच दरम्यान मैदानावर दिली धडक)
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने 17 फेब्रुवारी (सोमवार) रोजी याची पुष्टी केली. डु प्लेसिस म्हणाला, 'दक्षिण आफ्रिका क्रिकेट नव्या युगात आले आहे, नवीन नेतृत्व, नवे चेहरे, नवीन आव्हाने आणि नवीन रणनीती. मी अद्याप दक्षिण आफ्रिका संघासाठी तीनही स्वरूपात खेळाडू म्हणून खेळेन आणि संघाच्या नवीन कर्णधाराला मदत करीन." त्याने पुढे लिहिले, “35 वर्षीय डु प्लेसिसने क्विंटन डी कॉक यांच्या नव्या कारभाराखाली संघातील पुढच्या पिढीच्या संघाच्या उदयास मदत करण्यासाठी कर्णधारपदापासून मागे हटण्याची गरज असल्याचे नमूद केले.” इंग्लंडचा आफ्रिका दौरा पूर्ण झाला आहे आणि मार्च महिन्यात टीम भारत (India) दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यावर त्यांना 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. डी कॉकने यापूर्वी वनडे कर्णधार म्हणून त्याच्या जागा घेतली आहे. अशामध्ये टेस्ट आणि टी-20 संघाची जबाबदारी कोणाला देण्यात येते याची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
#BreakingNews @faf1307 has announced that he is stepping down from his role as captain of the Proteas’ Test and T20 teams effective immediately. #Thread pic.twitter.com/ol9HzpEOhZ
— Cricket South Africa (@OfficialCSA) February 17, 2020
कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सह 112 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करत त्याने 69 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार म्हणून त्याने सर्व स्वरूपात 11 शतकं आणि 28 अर्धशतकांसह 5,101 धावा केल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेला बर्याच संस्मरणीय विजय मिळवून दिलेले आहेत. खेळाच्या लांब स्वरुपात त्याच्या कर्णधारपदावर बरेच प्रश्न निर्माण झाले होते ज्यामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे समजले जात आहे. त्याच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या शेवटच्या आठ कसोटी सामन्यात आफ्रिकेला सातमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.