Pakistan National Cricket Team vs England National Cricket Team 1st Test 2024 Day 1 Scorecard: पाकिस्तान संघ विरुद्ध इंग्लंड संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने लंच ब्रेकपर्यंत 25 षटकांत 1 गडी गमावून 122 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून शान मसूद 59 चेंडूत 61 धावा आणि अब्दुल्ला शफीक 82 चेंडूत 53 धावा करत नाबाद आहे. याशिवाय सॅम अयुब 10 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. तर इंग्लंडकडून गस ऍटकिन्सनने 7 षटकांत 32 धावा देत 1 बळी घेतला. (हेही वाचा: Ireland vs South Africa 3rd ODI Pitch Report: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फलंदाज की गोलंदाज गाजवणार मैदान? अबुधाबीच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती जाणून घ्या )
पाकिस्तानला नुकतेच घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत पाकिस्तानने सात कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात दोनमध्ये विजय आणि पाचमध्ये पराभव झाला आहे. पाकिस्तान संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत 19.05 टक्के आणि 16 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, घरच्या मैदानावर श्रीलंकेवर कसोटी मालिका 2-1 ने जिंकून इंग्लंड संघाने त्यांचे स्थान मजबूत केले आहे. कर्णधार बेन स्टोक्सही इंग्लंड संघामध्ये परतला आहे. तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला असला तरी त्याच्या जागी ऑली पोप कर्णधारपद भूषवत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत, इंग्लंड संघाचे 16 सामन्यांत 8 विजय, 7 पराभव आणि 1 अनिर्णित 81 गुण आहेत.