England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. ऑली पोप इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना दिसणार असून श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 88 षटकांत सात गडी गमावून 358 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी इंग्लडंचा संघ पहिल्या डावात 427 धावांवर 10 विकेट गमावून बाद झाला आहे.
Asitha Fernando takes his fifth wicket to end England's innings after Gus Atkinson's maiden ton took the home side past 400 💪#ENGvSL ball-by-ball: https://t.co/kKZqez3EmQ pic.twitter.com/KVAOyCOSFT
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 30, 2024
त्याआधी, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडकडून जो रूटने 167 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. जो रूटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 33 वे शतक आहे. इंग्लंडकडून जो रूटने 143 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर गस ऍटकिन्सन 118 धावांची ताबडतोब शतकीय पारी खेळली. (हे देखील वाचा: (हे देखील वाचा: Joe Root Century: शतकवीर जो रूट! कसोटी कारकिर्दीतील झळकावले 33 वे शतक, अनेक दिग्गज खेळाडूंचा विक्रम काढला मोडीत)
दुसरीकेडे, श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो पाच, मिलन प्रियनाथ रथनायके आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी दोन बळी घेतले. या तिघांशिवाय प्रभात जयसूर्याला एक विकेट मिळाली.