Joe Root Century: शतकवीर जो रूट! कसोटी कारकिर्दीतील झळकावले 33 वे शतक, अनेक दिग्गज खेळाडूंचा विक्रम काढला मोडीत

ENG vs SL 2nd Test: शानदार फॉर्ममध्ये असलेला इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावण्यात यश आले आणि त्याचे कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे 33 वे शतक ठरले. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी फॉर्मेटमधील जो रूटचे हे 5 वे शतक होते.

Joe Root Century: शतकवीर जो रूट! कसोटी कारकिर्दीतील झळकावले 33 वे शतक, अनेक दिग्गज खेळाडूंचा विक्रम काढला मोडीत
Joe Root (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवार म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. दरम्यान, शानदार फॉर्ममध्ये असलेला इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात शतक (Joe Root Cnetury) झळकावण्यात यश आले आणि त्याचे कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील हे 33 वे शतक ठरले. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी फॉर्मेटमधील जो रूटचे हे 5 वे शतक होते.

जो रूटने तीन दिग्गजांचे रेकॉर्ड काढले मोडीत

जो रूटने 162 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 33 वे शतक पूर्ण केले आणि त्याने केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ आणि स्टीव्ह वॉ यांचे विक्रम मोडीत काढले. या तिन्ही फलंदाजांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 32-32 शतके झळकावली आहेत, मात्र आता या शतकासह जो रूटने या तिघांनाही मागे टाकले आहे. याशिवाय जो रूटने इंग्लंडसाठी 33 कसोटी शतके झळकावणाऱ्या इंग्लंडचा माजी खेळाडू ॲलिस्टर कूकची पातळी गाठली आहे. इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणारा जो रुट आता कुकसोबत संयुक्त पहिला ठरला आहे.

जो रूटने ॲलिस्टर कुकचा विक्रम मोडला

जो रूटने त्याच्या शतकादरम्यान ॲलिस्टर कुकचा विक्रम मोडला आणि तो इंग्लंडमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. जो रूटने आतापर्यंत इंग्लंडमध्ये (लेखनापर्यंत) कसोटीत 6577 धावा केल्या आहेत, तर एकूण 6568 धावा आहेत. (हे देखील वाचा:

इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा

6577 धावा – जो रूट (सरासरी: 55.26)

6568 धावा ॲलिस्टर कूक (सरासरी: 44.37)

5917 धावा – ग्रॅहम गूच (सरासरी: 46.22)

4716 धावा – माईक अथर्टन (सरासरी: 38.97)

4650 धावा - ॲलेक स्टीवर्ट (सरासरी: 40.78)

(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2024 09:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).