ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिका भारताने दिमाखात जिंकली. या शानदार विजयानंतर इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर (IND vs ENG Test Series 2021) येणार आहे. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला टक्कर दिल्यानंतर भारतापुढे आता इंग्लंडचे खेळाडू जो रूट (Joe Root), बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यांसारख्या खेळाडूंचे मोठे आव्हान असणार आहे. इंग्लंडचा संघ येत्या 27 जानेवारीपासून भारतात बायो बबलमध्ये दाखल होणार आहे. तसेच सर्व खेळाडूंना काटेकोरपणे कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 5 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. तर, दुसरा कसोटी सामना 13 फेब्रुवारी खेळण्यात येणार आहे. हे दोन्ही सामने चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम येथे होणार आहेत. दोन दिवसांपूर्वी (19 जानेवारी) भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध आपला संघ जाहीर केला होता. त्यानंतर आता इंग्लंडच्या संघानेही कसोटी मालिकेसाठी नुकताच आपला संघ जाहीर केला आहे. हे देखील वाचा- Return of Virat Kohli: विराट कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही, पण ड्रेसिंग रूममध्ये 'फॅब 4'चे महत्व वाढले; जाणून घ्या कोण आहेत ते चार खेळाडू
इंग्लंडचा कसोटी संघ- जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अँडरसन, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वॉक्स
भारतीय कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमाना साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कौटुंबिक कारणामुळे रजेवर असलेला भारतीय कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे कर्णधार पद संभाळले होते. मात्र, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर, अजिंक्य रहाणे याच्याकडे कसोटी मालिकेसाठी उपकर्णधार हे पद कायम असणार आहे.