ENG vs PAK 1st Test: इंग्लडने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले 7 विश्वविक्रम, चार फलंदाजांनी झळकावली शतके
ENG Team (Photo Credit - Twitter)

ENG vs PAK: बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी तीन कसोटी  सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी 500 हून अधिक धावा करत विश्वविक्रम केला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा इंग्लंड संघ जगातील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी 1910 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने 494 धावांचा डोंगर उभा केला होता. 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी खेळणाऱ्या इंग्लंड संघाने हा सामना संस्मरणीय बनवला. त्यांनी एक-दोन नव्हे तर एकूण 7 विश्वविक्रम केले आणि एक एक करून अनेक विक्रम केले. याशिवाय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या दिवशी चार खेळाडूंनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सर्वात वेगवान द्विशतकी भागीदारी

इतर विक्रमांबद्दल बोलायचे झाल्यास, कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक 174 धावा करण्याचा विश्वविक्रमही इंग्लंडच्या नावावर आहे. त्याच वेळी, जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी मिळून सर्वात जलद द्विशतक भागीदारीचा विश्वविक्रम केला.

इंग्लंडसाठी सर्वात जलद शतकी सलामीवीर

इंग्लंडच्या विक्रमांची यादी इथेच संपत नाही. जॅक क्रॉलीने 86 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि कसोटीत इंग्लंडसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा सलामीवीर बनला. त्याचवेळी हॅरी ब्रूक हा कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा इंग्लंडचा तिसरा खेळाडू ठरला. हॅरी ब्रूक आणि बेन डकेटनेही या सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. (हे देखील वाचा: IND vs BNG ODI & Test Series 2022 Schedule: न्यूझीलंडसोबत वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचा बांग्लादेश दौरा, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक)

स्टोक्स आणि ब्रूक नाबाद

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून इंग्लंड संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 4 गडी गमावून 506 धावा केल्या. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 216 चेंडूत 233 धावांची विक्रमी भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपापली शतके पूर्ण केली. दोघे बाद झाल्यानंतर ओली पोप आणि त्यानंतर कारकिर्दीतील दुसरा सामना खेळणाऱ्या हॅरी ब्रूकनेही शतके झळकावली. चार शतकांच्या जोरावर इंग्लंडने रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दिवशी अवघ्या 75 षटकांत 4 गडी गमावून 506 धावा जोडल्या. ब्रूक 81 चेंडूत 101 धावा करून नाबाद परतला आणि बेन स्टोक्सने 15 चेंडूत 34 धावा केल्या.