जोफ्रा आर्चर (Photo Credit: Getty)

मागील आठवड्यात जैव-सुरक्षा प्रोटोकॉलचा (Bio-Secure Protocol) भंग केल्याबद्दल वेस्ट इंडिजविरुद्ध मॅन्चेस्टर (Manchester) येथील दुसर्‍या कसोटी सामन्यातून वगळल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्णद्वेषाचा (Racism) सामना करावा लागल्याचा दावा केला आहे. कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी इंग्लंड-वेस्ट इंडीज मालिका संपूर्णपणे बायो सिक्युर वातावरणात खेळली जात आहे. पण मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर आर्चरने घरी जाण्याची चूक केली, ज्यासाठी त्याला दुसर्‍या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते. डेली मेल मधील त्यांच्या कॉलममध्ये आर्चेरने लिहिले की, “गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर माझ्यावर टीका केली जात आहे, त्यामध्ये वर्णद्वेषी टिप्पण्यांचा समावेश आहे. आणि मी ठरविले आहे की पुरे झाले.” त्याने लिहिले, "जेव्हा क्रिस्टल पॅलेसचे फुटबॉलर विलफ्राइड जाहाला एक 12 साल के बच्चे ने ऑनलाइन अपशब्द कहे, मी तिथेच सीमारेषा काढण्याचं ठरवलं आणि मी कोणालाही पळून जाऊ देणार नाही. म्हणून मी माझी तक्रार ईसीबीला पाठविली आहे आणि त्या पुढील कारवाई करतील.” (ENG vs WI 3rd Test: वेस्ट इंडीजविरुद्ध तिसर्‍या टेस्टसाठी बेन स्टोक्सला मिळू शकते विश्रांती, इंग्लंडचे प्रशिक्षकाने दिले संकेत)

बायो सिक्योर बबल प्रोटोकॉल तोडल्यामुळे मॅनचेस्टर टेस्टमधून बाहेर पडल्यावर आर्चर बर्‍याच अडचणीत सापडला. तो म्हणाला की क्वारंटाइनच्या वेळी त्याला खूप निराश वाटत होते. त्याने लिहिले की, “मला असे वाटले की मी नेट्समध्ये परत गोलंदाजीची सुरुवात करण्यास प्रेरित होत नव्हतो. कोविड-19 प्रोटोकॉल तोडल्यानंतर मी जेव्हा क्वारंटाइन कालावधी संपवून खोलीच्या बाहेर जात होतो तेव्हा माझे जिथे जिथे जायचे तेथे कॅमेरे होते. या संपूर्ण दृश्याने मला अस्वस्थ केले. मला माहित आहे की मी चूक केली आहे आणि त्याचा परिणाम मला सहन करावा लागला आहे. मी कोणताही गुन्हा केला नाही. आणि मला पुन्हा पहिल्या सारखे वाटत होते."

इंग्लंड-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेतील तिसरा सामना मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर मालिकेचा अंतिम सामना खेळला जाईल. वेस्ट इंडिजने पहिला आणि इंग्लंडने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 ने बरोबरीत झाली आहे. यामुळे मालिकेचा अंतिम सामना जिंकण्याचा दबाव दोन्ही टीमवर असणार आहे. आर्चर देखील तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. शुक्रवार, 24 जुलै रोजी मॅन्चेस्टरमध्ये तिसरा सामना खेळला जाईल.