ENG vs PAK 2nd Test: साउथॅम्प्टन (Southampton) येथील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना पाकिस्तानी टॉप-ऑर्डर (Pakistani Top-Order) फलंदाजांना सामोरे जाता आले नाही आणि 126 धावांवर पाच विकेट गमावल्या. पावसाने खेळात व्यत्यय आणला ज्यामुळे अखेर खेळ ठरलेल्या वेळेपूर्वी संपवावा लागला. त्यावेळी बाबर आझम (Babar Azam) 25 आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) चार धावा करत खेळत होता. जोरदार पावसामुळे चहा आणि लंच देखील लवकर घेण्यात आले. अखेरच्या सत्रात पाकिस्तानने तीन विकेट गमावल्या आणि केवळ 44 धावा जोडल्या. पहिल्या दिवशी केवळ 45.4 ओव्हरचा खेळ झाला आणि आज, दुसऱ्या दिवशी देसखील पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. पहिल्या सत्रात पहिल्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या शान मसूदला जिमी अँडरसनने (James Anderson) डावाच्या 14 व्या ओव्हरमध्ये बाद केले. त्यावेळी पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर सहा धावा अशी होती. पहिल्या सत्रात यजमान वेगवान गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला. (पाकिस्तानविरुद्ध अपशब्द वापरल्याने स्टुअर्ट ब्रॉडवर मॅच रेफरीच्या वडिलांना लगावला 15 टक्के दंड, इंग्लंडने गोलंदाजाने दिली अशी प्रतिक्रिया See Tweet)
अबीद अलीला दोन वेळा स्लिपमध्ये जीवदान मिळाले. त्याने खाते उघडले नसताना तिसऱ्या स्लिपमध्ये डोम सिब्लीने पहिले त्याचा कॅच सोडला, त्यानंतर, रोरी बर्न्सने दुसर्या स्लिपमध्ये 21 धावांवर अलीला जीवदान दिले. गेल्या 12 कसोटी सामन्यात केवळ 139 धावा करणारा कर्णधार अझर अलीला 20 धावा करून खेळत असताना पावसामुळे दहा मिनिटांपूर्वी त्याला लंच ब्रेक घ्यावा लागला होता. लंच ब्रेकनंतर अँडरसनने त्याला तंबूत पाठवले. चहापानंतर आबिद अलीला 60 धावांवर सॅम कुर्रानने रोरी बर्नच्या हाती झेलबाद केले. आबिदने 111 चेंडूंच्या डावात 7 चौकार ठोकले. असद शफीकला 5 धावांवर स्टुअर्ट ब्रॉड आणि फवाद आलमला शून्यावर क्रिस वोक्सने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी करूनही संघात स्थान मिळवलेल्या अँडरसनने 15 षटकांत 35 धावा देऊन दोन गडी बाद केले.
यापूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला परंतु दोन तासांनंतर पाऊसा मुळे खेळ थांबवावा लागला. इंग्लंडने संघात दोन बदल केले आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या जागी वेगवान गोलंदाज सॅम कुर्रानला स्थान दिले, तर कौटुंबिक कारणास्तव न्यूझीलंडला परतलेल्या अष्टपैलू बेन स्टोक्सच्या जागी फलंदाज जॅक क्रोलीला स्थान देण्यात आले. पाकिस्तानने फवाद अलामला अष्टपैलू शादाब खानच्या जागी संधी दिली.