श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सरफराज अहमदला (Sarfaraz Ahmed) सर्व फॉर्ममध्ये कर्णधारपदावरून काढून टाकले. शिवाय, त्याच्या खराब फॉर्ममुळे त्यालाही संघातून वगळण्यात आलं आणि बर्याच जणांचा विचार केला की तो पुन्हा संघात परत येईल का? तथापि, सरफराज कसोटी संघात परतला, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला (England) पोहचला. दुर्दैवाने त्याची कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले नाही. ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले. पण, सध्या सरफराज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यामागील कारण म्हणजे कसोटीच्या दुसर्या दिवशी फलंदाजांसाठी शूज घेऊन जाताना दिसला. पाकिस्तानच्या (Pakistan) डावातील 71व्या षटकात ही घटना घडली जेव्हा रिझर्व्ह खेळाडू सरफराज आपल्या सहकाऱ्यांसाठी खेळपट्टीवर शूज घेऊन आला. (ENG vs PAK 1st Test: बाबर आझमने जडले शानदार अर्धशतक; विराट कोहली असता तर सर्वांनी केली असती चर्चा म्हणत नासिर हुसैन यांनी दिली प्रतिक्रिया)
सरफराजचे फोटो लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चाहत्यांना त्याच्याबद्दल वाईट वाटले व ते सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. तथापि, बर्याच लोकांनी त्याचे कौतुक केले आणि विराट कोहली, डॉन ब्रॅडमन यांच्यासारख्या दिग्गजांशी तुलना केली जे खेळत नसताना आपल्या टीमच्या साथीदारांसाठी ड्रिंक्स घेऊन आले. सरफराजच्या या कृतीवर ट्विटर यूजर्सच्या प्रतिक्रिया पाहा:
सरफराज अहमद ड्रिंक सर्व्ह केले
Once again, deliberate anti-#Misbah campaign launched during #ENGvPAK test match.
First it was started when #FawadAlam was not selected
Now journalist & some social media users from #Karachi started ranting on Misbah that why #SarfrazAhmed carried drinks.
~Facepalm moment~ pic.twitter.com/nk9fFQbsw3
— SherY (@SherySyed2) August 7, 2020
आमचा कप्तान
Our Kaptaan. Once a time he was a Leader and now he serving his team as a 12th man. ICC Trophy winner to 12th man just because he is from Karachi.
Yee Khail hay Punjabiyoon Ka.!!#Karachi #captain #PCB #SarfrazAhmed #MisbahUlHaq #Punjabi #PakvsEng #Cricket pic.twitter.com/1VxlHVc1RX
— Muhammad Haider (@MuhammadHyder) August 6, 2020
डॉन ब्रॅडमन
TWITTER:
HOW DARE THEY MAKE SARFRAZ AHMED CARRY DRINKS OMG THAT IS SO DISRESPECTFUL
BRADMAN:
Oh, you have got a photograph of me carrying drinks? Here, let me sign it. pic.twitter.com/GwBtVlAqKL
— Abhishek Mukherjee (@ovshake42) August 7, 2020
'पाणी बॉय'
Those who are admiring Sarfraz Ahmed character as 'paani boy' are showing the misery of our minds. We were slaves, we are slaves and will be slaves. #ThingsIJustDontUnderstand
— Subhan Irfan (@MSubhan53837984) August 7, 2020
कोणताही खेळाडू ड्रिंक्स नेण्यासाठी खूप मोठा किंवा महत्वाचा नाही.
Some people unhappy that Sarfaraz Ahmed was carrying the drinks today.
No player is too big or too important to carry the drinks.
Misbah's reply at the press conference "even I carried the drinks for the team in Australia" #EngvPak #Cricket pic.twitter.com/BMX845PFhj
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) August 6, 2020
विराट कोहली किंवा विल्यमसन
Virat kohli or Williamson 2no water boy bane huyE hain ...kiya @SarfarazA_54 in sy bara player ha
Jutt sahab Choti Choti bato ko khamakha dill py naa lo ... Orr naa hee koi breaking news banaye plz 🙏🙏 @Shoaib_Jatt pic.twitter.com/Xl6nVG4E7z
— Abdullah Khan (@Abdullahkhaan44) August 7, 2020
आणि कोहलीचे काय
#And what about kohli pic.twitter.com/VzUbhSCFYV
— Abbas (@Abbas11524515) August 7, 2020
क्रिकेटमधील काही मोठ्या नावांनी हे केले आहे
Some of the biggest names in cricket have done it and I'm sure Sarfaraz Ahmed had no problems carrying the drinks too #ENGvPAK #Cricket pic.twitter.com/HfxjiJpcf2
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) August 7, 2020
दरम्यान, संघात पुनरागमन केल्यामुळे सरफराज आता संघात त्याच्या टीममध्ये शिक्कामोर्तब करण्यासाठी संधीची वाट पाहणार आहे. त्याच्या जागी खेळवण्यात आलेला मोहम्मद रिझवानने विकेटच्या मागे चांगली कामगिरी केली पण फलंदाजी म्हणून अद्याप त्याला छाप पाडता आली नाही. कर्णधार म्हणून सरफराजच्या नेतृत्वात पाकिस्तानने इंग्लंडमध्ये 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद जिंकले. परंतु टीमला मागील वर्षीच्या विश्वचषक उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवण्यात सरफराजच्या अपयशामुळे त्याला ऑक्टोबरमध्ये तीनही फॉर्मेटचा कर्णधार म्हणून काढून टाकण्यात आले.