प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

इंग्लंड विरुद्ध खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानच्या संघाला 1-0 असा पराभव पत्कारावा लागला होता. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (ENG Vs PAK 1st T20) यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द झाला आहे.  मँचेस्टरच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना 16 षटकात पावसाचे मैदानात आगमन झाले. बराच काळ पावसाची संततधार सुरु होती. दरम्यान, खूप वेळ वाया गेल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला आहे.

नाणे फेक जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. सामाना सुरु झाल्यानंतर काही क्षणातच इमाद वासिमने सलामीवीर जॉनी बेअरस्टोला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर टॉम बॅन्टनने चांगली कामगिरी करत संघाचा डाव सावरला. त्याने 4 चौकार आणि 5 षटकार सहाय्याने 71 धावांची खेळी केली होती. मात्र, बॅन्टन बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला पुन्हा गळती लागली. सोळाव्या षटकात इंग्लंडचा संघाला 6 बाद 131 अशी धावसंख्या उभारता आली. परंतु, त्यावेळी मैदानात पावसाचे आगमन झाल्याने हा सामना रद्द करावा लागला आहे. हे देखील वाचा- National Sports Day 2020 निमित्त सचिन तेंडुलकर याचे खास ट्विट; देशाला फीट आणि हेल्थी करण्यासाठी दिला 'हा' संदेश

इंग्लंड-पाकिस्तानमधील यांच्यातील दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि शेवटचा सामना 1 सप्टेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाकडे सर्वांचे लागले आहे. कसोटी मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तानचा संघ टी-20 मालिकेत विजय मिळवण्यासाठी उत्सूक असल्याचे दिसत आहे.