मुरली विजय, एलिस पेरी (Photo Credit: Getty)

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय (Murali Vijay) याने एक इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटवर डिनर डेटवर जाण्यासाठी आवडती व्यक्ती म्हणून ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलिस पेरी (Ellyse Perry) आणि टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन यांच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय म्हणाला होता, "एलिसपेरी, मी तिच्याबरोबर डिनर डेटवर जायला आवडेल. ती खूपच सुंदर आहे आणि कधीही शिखर धवन सोबत जाऊ शकतो. तो एक अतिशय मजेदार व्यक्ती आहे. फक्त एकच गोष्ट तो हिंदीमध्ये आणि मी तामिळमध्ये बोलणार आहे." विजयच्या या प्रस्तावानंतर पेरीने त्याच्या सोबत डिनर डेटवर जाण्यासाठी होकार दिला आहे, पण एका अटीवर. ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू म्हणाली की मुरली विजय हे बिल भरत असल्याची त्यांना आशा आहे आणि तिला तिची प्रशंसा ऐकून आनंद झाला. (VIDEO: डेविड वॉर्नर याने पत्नी Candice सह तेलगू गाणे Butta Bomma वर केला मजेदार डांन्स, स्टार अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला धन्यवाद)

स्टार स्पोर्ट्सच्या इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून पेरीने संवाद साधला. त्या मुलाखती दरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यातच मुरली विजयच्या डेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने सर्व खुश होतील असे उत्तर दिले. “डेटवर जायला मी तयार आहे, पण एका अटीवर… त्याने बिल भरायला हवं. तो डेटचे पैसे भरत असेल, तर मी डेटवर नक्की जाईन. तो खूप चांगला माणूस आहे’, असे बिंदास उत्तर एलिस पेरीने दिले. पाहा हा विडिओ:

2015 मध्ये पेरीचे रग्बी स्टार मैट टोमुआशी लग्न झाल्यामुळे विजयच्या टिप्पणीनंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले होते. दरम्यान, पेरीने कोरोना व्हायरस संपेल तेव्हा ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीम मैदानावर पाऊल ठेवणारी पहिली टीम असेल अशी आशा या लाईव्ह चॅटमध्ये व्यक्त केली. इतकेच नव्हे तर कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर महिला बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धा सुरू करेल अशी आशाहीव्यक्त केली आहे.