VIDEO: डेविड वॉर्नर याने पत्नी Candice सह तेलगू गाणे Butta Bomma वर केला मजेदार डांन्स, स्टार अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला धन्यवाद
(Photo Credit: VideoScreenGrab/ Instagram)

ऑस्ट्रेलियाचा सलामी फलदांज डेविड वॉर्नर (David Warner) क्वारंटाइनचा वापर आपल्या भारतीय चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी चांगल्या प्रकारे करत आहे. भारता प्रमाणेच ऑस्ट्रेलियामधेही लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने वॉर्नर सध्या सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाला आहे. वॉर्नरने काही दिवसांपूर्वी टिकटॉकवर (TikTok) डेब्यू केले. हिंदी गाण्यावर मुलींबरोबर उत्कृष्ट डांन्स सादर केल्यानंतर आता वॉर्नरचा नवीन डांन्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वॉर्नरने अलीकडेच त्यांची मुलगी इंडी रेसह 'शीला की जवानी' या बॉलिवूड गाण्यावर डान्स केल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याच्या अलिकडील व्हिडिओमध्ये, त्याने दक्षिणेकडे एक सहल घेण्याचा निर्णय घेतला आणि पत्नी कॅन्डिस वॉर्नरसह (Candice Warner) दक्षिण चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) लोकप्रिय तेलगू गाण्यावर मजेदार डांन्स सादर केला. (डेविड वॉर्नरला बॅटने स्वतः सारखी तलवारबाजी करताना पाहून रवींद्र जडेजा ने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video)

या व्हिडिओमध्ये वॉर्नर आणि त्याची पत्नी कॅन्डिस अल्लू अर्जुन अभिनीत ‘अल्ला वैकुंठपुरमूलू’ या चित्रपटाच्या तेलुगू गीत 'बूटा बोमा'वर डांन्स करताना पाहिले जाऊ शकते. व्हिडिओमध्ये वॉर्नरची मुलगीही एक गेस्ट अपीरियंस देताना दिसत आहे. वॉर्नर आणि पत्नी कँडिसचा मजेदार डांन्स पाहून खुद्द अल्लू अर्जुनलाही हसू अनावर झाले. वॉर्नरने शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनने हास्यास्पद इमोजी सह धन्यवाद अशी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

It’s tiktok time #buttabomma get out of your comfort zone people lol @candywarner1

A post shared by David Warner (@davidwarner31) on

पाहा अल्लू अर्जुनची कमेंट

वॉर्नर आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज आहे. तो या संघाचा कर्णधारही आहे. तेलगू ही हैदराबादची प्रादेशिक भाषा आहे. आणि वॉर्नरने आपल्या स्थानिक टीमच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी हा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी वॉर्नरच्या मुलीचा टिकटॉक व्हिडिओही समोर आला होता. दरम्यान, आयपीएलचा सहकारी आणि इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टोशी झालेल्या इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटदरम्यान वॉर्नरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा धोका पत्करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.