पाकिस्तान क्रिकेट टीमचे (Pakistan Cricket Team) माजी सलामी फलंदाज आणि प्रशिक्षक मोहसीन खान (Mohsin Khan) यांनी पाकिस्तान संघाच्या फिटनेस पातळीवर जोरदार टीका केली 11 पैकी आठ खेळाडू तंदुरुस्तीच्या निकषांच्या पलीकडे नाहीत असा दावा केला आहे. तथापि, त्यांनी शर्जील खानची (Sharjeel Khan) बाजू मांडली आणि म्हणाले की, "तो एक अतिशय हुशार खेळाडू आहे." मोहसीनने पाकिस्तानकडून 1977 ते 1986 दरम्यान 48 टेस्ट आणि 75 एकदिवसीय सामने खेळले आहेत. टॉप ऑर्डर सर्व दबाव शर्जीलवर टाकते अशी चिंता मोहसिनने व्यक्त केली. स्पॉट फिक्सिंगमध्ये अडीच वर्षाची बंदीचे शिक्षेस शार्जिलच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन झाल्यानंतर मोहसिनने टिप्पणी केली आहे. पीसीबीने फलंदाजास दुसरी संधी देण्याच्या निर्णयावर अनेक खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे, तर मोहसीनने त्याची पाठ राखण केली आणि खानला संघात न घेण्यासाठी फिटनेस हे शेवटचे पॅरामीटर असावे असं मत व्यक्त केलं. (Coronavirus पासून लढणाऱ्या हिंदू गोलंदाज दानिश कनेरिया ने पाकिस्तानी अल्पसंख्याकांसाठी मागितली युवराज-हरभजन सिंहची मदत)
“पाकिस्तानसाठी ओपनिंग नेहमीच एक समस्या राहिली आहे. शर्जील खान एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याची फिटनेस ही मोठी चिंता नसावी कारण मला वाटते पाकिस्तानच्या अकरा खेळाडूंपैकी आठकडे आवश्यक तशी फिटनेस नाहीत त्यामुळे त्यात फारसा फरक पडत नाही,” मोहसीन यांनी डेली एक्सप्रेसला सांगितले. मोहसिन पुढे म्हणाले की, माजी कर्णधार मिसबाह-उल-हक यांना प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवड समितीच्या दोन भूमिका बजावण्याचे ते समर्थन करत नाही कारण त्यांच्या निर्णयावर विश्वासार्हतेचा अभाव आहे. ते म्हणाले, “जेव्हा इमरान खान पंतप्रधान बनले तेव्हा मला अपेक्षित होते की पीसीबीमधील निर्णय गुणवत्तेवर घेतले जातील पण तसे दिसत नाही. संघाच्या कामगिरीत सातत्य नसल्याने आमचे क्रिकेट रुळावर उतरले आहे. मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता मिसबाह उल हक यांची जबाबदारी कशी असेल? जेव्हा एकच व्यक्ती मुख्य प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता असेल तर मग कोण जबाबदार असेल."
2011 मध्ये पाकिस्तान संघाचे इंट्रीम प्रशिक्षक असलेले मोहसीन यांनाही दुहेरी जबाबदारी देण्यात आली होती, परंतु हितसंबंधाच्या संघर्षामुळे त्यांनी ती नाकारल्याचे त्यांनी उघडकीस केले. इंग्लंडच्या प्रशिक्षित लॉर्ड्स मैदानावर दुहेरी शतक ठोकणारे मोहसीन हे पाकिस्तानचे पहिले फलंदाज आहे.