बसला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा हे दोघेही भारत 'ब' संघातून बाहेर झाले आहेत, तर भारत 'सी' उमरान मलिकही या सामन्यात खेळणार नाही. दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी संघांमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. पुरुष निवड समितीने 2024-25 दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीसाठी संघातील काही पर्यायांची घोषणा केली आहे. बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सिराज आणि मलिक दोघेही आजारी आहेत आणि ते दोघेही वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत सिराजच्या जागी नवदीप सैनीचा तर मलिकच्या जागी गौरव यादवचा समावेश करण्यात आला आहे. (हेही वाचा  - ICC Women's T20 World Cup: आयसीसीकडून महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; बीसीसीआयकडून खेळाडूंची यादी जाहीर )

जडेजाचे न खेळण्याबाबतचे कारण अद्याप समोर आले नाही. त्याच्याबाबत प्रसिद्धीपत्रकात फक्त एकच नमूद करण्यात आले आहे की, त्याला 'ब' संघाच्या संघातून मुक्त करण्यात आले आहे. तर नितीश कुमार रेड्डी यांचे दुलीप ट्रॉफी खेळणे त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. तो सध्या स्पोर्ट्स हर्नियाच्या दुखापतीतून सावरत आहे.

दुलीप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याचे सामने अनंतपूर आणि बेंगळुरू येथे होणार आहेत. भारत-बांग्लादेश कसोटी मालिकाही 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, अशा परिस्थितीत भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंच्या जागी दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत इतर खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.