ICC Women's T20 World Cup: यंदाचे वर्षे महिला विश्वचषकाचे नववे वर्ष असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची(India Woman Team) घोषणा केली. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)संघाची कर्णधार असून संघाचे नेतृत्व करेल. स्मृती मानधना उपकर्णधार, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (wk), यास्तिका भाटिया आणि पूजा वस्त्राकर यष्टीरक्षक असतील, अरुंधती रेड्डी , रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन यांच्या नावाची यादी बीसीसीआयने जाहीर केली आहे. (हेही वाचा:ICC Women's T20 World Cup 2024: महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार पाकिस्तानशी लढत )
Womens T20 World Cup 2024: भारतीय महिला संघाचे वेळापत्रक
4 ऑक्टोबर, शुक्रवार, भारत वि. न्यूझीलंड, दुबई
6 ऑक्टोबर, रविवार, भारत वि. पाकिस्तान, दुबई
9 ऑक्टोबर, बुधवार, भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
13 ऑक्टोबर, रविवार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह
सेमीफायनल 1 ऑक्टोबर रोजी शारजाह येथे
उपांत्य अंतिम 2 ऑक्टोबर रोजी दुबईत
दुबईत ऑक्टोबरमध्ये फायनल होणार आहे
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार
🚨 NEWS 🚨
Presenting #TeamIndia's squad for the ICC Women's T20 World Cup 2024 🙌 #T20WorldCup pic.twitter.com/KetQXVsVLX
— BCCI Women (@BCCIWomen) August 27, 2024
फलंदाजीच्या बाजूची जबाबदारी सलामीवीर शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दयालन हेमलता यांच्यावर सोपावण्यात आली आहे. तर सजना सजीवनलाही संघात संधी मिळाली आहे. फिरकीचे नेतृत्व दीप्ती शर्मा, राधा यादव आणि लेग-स्पिनर आशा शोभना यांच्याकडे असेल.