India Women's National Cricket Team Schedule: आयसीसीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक 2024 चे नवीनतम वेळापत्रक जाहीर केले आहे. स्पर्धेची बहुप्रतिक्षित नववी आवृत्ती बांगलादेशमधून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये हलवण्यात आली आहे. आयसीसीने सांगितले की, हे सामने दुबई आणि शारजाहमध्ये खेळवले जातील. 2020 च्या उपविजेत्या भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह सहा वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला अ गटात ठेवण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान 6 ऑक्टोबरला दुबईत एकमेकांशी भिडणार आहेत. 2016 चा चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंडसह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला ब गटात ठेवण्यात आले आहे.
श्रीलंका आणि स्कॉटलंड या वर्षाच्या सुरुवातीला अबू धाबी येथे झालेल्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले. महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धेत प्रत्येक संघाची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे तर उपांत्य फेरी 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्पर्धेपूर्वी 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 10 सराव सामने खेळवले जातील. (हेही वाचा: England Cricket Team: ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी इंग्लंडच्या क्रिकेट संघाची घोषणा; दोन्ही फॉरमॅटसाठी असणार वेगवेगळे कर्णधार)
महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर-
𝗠𝗮𝗿𝗸 𝗬𝗼𝘂𝗿 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿 🗓️#TeamIndia's schedule for the ICC Women's #T20WorldCup 2024 is 𝙃𝙀𝙍𝙀 🔽 pic.twitter.com/jbjG5dqmZk
— BCCI Women (@BCCIWomen) August 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)