सचिन तेंडुलकर आणि डॉन ब्रॅडमन (Photo Credit: Twitter/sachin_rt)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत क्रिकेट विश्वाचे सर्वांत महान फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांची आठवण काढली. सचिनने जेव्हा 90 च्या दशकात क्रिकेटच्या मंचावर राज्य करण्यास सुरुवात केली तेव्हा क्रिकेटचे 'डॉन' ब्रॅडमनशी यांच्याशी त्याची तुलना व्हायची. ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी कर्णधार ब्रॅडमन 1948 मध्ये निवृत्त झाले, पण दशकांत कोणीही आजवर त्यांच्या सर्वोच्च स्थानालाआव्हान देऊ शकला नाही. आज, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराची 112 व्या वाढदिवसानिमित्त सचिनने ट्विटरवर ब्रॅडमनबरोबर आपला एक प्रसिद्ध फोटो शेअर केला आणि खास मेसेज लिहिला. 1998 साली 90 व्या वाढदिवसासाठी ब्रॅडमन यांनी अ‍ॅडिलेड येथील त्यांच्या घरी शेन वॉर्नसह (Shane Warne) तेंडुलकरला आमंत्रित केले होते. ब्रॅडमन आणि सचिनमधील या भेटी दरम्यान हा फोटो आहे. (Sachin Tendulkar Recommended MS Dhoni for Captaincy: एमएस धोनीला कर्णधारपद मिळवून देण्यात सचिन तेंडुलकरची काय होती भूमिका? वाचा सविस्तर)

ब्रॅडमनच्या वाढदिवसासाठी आपल्या पोस्टमध्ये, सचिनने दुसरे महायुद्ध असूनही ब्रॅडमनच्या प्रेरणादायी प्रवासाचे संपूर्ण स्मरण करून दिले. सध्याच्या कोविड-19 संकटात अडचणींचा सामना करावा लागलेला समकालीन खेळाडू सर्व अडचणी असूनही ब्रॅडमनच्या शीर्षस्थानाच्या प्रवासातून प्रेरणा मिळवू शकतात असे सचिनचे मत आहे. "दुसर्‍या महायुद्धामुळे सर डॉन ब्रॅडमन कित्येक वर्षांपासून क्रिकेट बॅट आणि बॉलपासून दूर होते, तरीही कसोटीतील सर्वोच्च फलंदाजीची सरासरी आहे. अनिश्चितता आणि दीर्घ विश्रांतीमुळे आज खेळाडूंच्या फॉर्मविषयी असलेल्या चिंतेसह, त्याचे कारकीर्द प्रेरणा स्त्रोत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा सर डॉन," सचिन तेंडुलकरने लिहिले.

27 ऑगस्ट 1908 रोजी जन्मलेल्या महान डॉन ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियाकडून 1928 ते 1948 पर्यंत 52 कसोटी सामने खेळले आणि आणि 99.94 च्या फलंदाजीच्या सरासरीने निवृत्त झाले. ब्रॅडमन यांच्या या विक्रमाच्या जवळ कोणालाही येता आले नाही, जो खेळाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट आहे. 25 फेब्रुवारी 2001 रोजी ब्रॅडमन यांचे, 92 व्या वर्षी तेंडुलकर आणि वॉर्न यांची भेट घेतलेल्या केन्सिंग्टन पार्कच्या घरी निधन झाले.