IND W vs AUS W 4th T20: तिसऱ्या टी-20 सामन्यात दारुण पराभवानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाशी भिडणार (IND vs AUS) आहे. सध्या ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमधला चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आणखी रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघांमधला दुसरा टी-20 सामना अतिशय रोमांचक झाला. त्याचवेळी तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून दिले. ऑलिस पॅरीची अवघ्या 45 चेंडूत 75 धावांची खेळी शानदार होती. ग्रेस हॅरिसने केवळ 18 चेंडूत 41 धावांची जलद खेळी केली.
मालिकेत जिवंत राहण्याचे आव्हान
मालिकेत जिवंत राहण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या संघाला चौथा सामना जिंकणे आवश्यक आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यातील चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. चाहते डिस्ने + हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. (हे देखील वाचा: भारत गमावू शकतो World Cup 2023 चे यजमानपद, BCCI समोर आव्हान; घ्या जाणून, नेमके कारण काय?)
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), देविका वैद्य, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, अंजली सरवानी, मेघना सिंह, रेणुका ठाकूर सिंह.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अॅलिसा हिली (कर्णधाप & विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, एलिस पेरी, ग्रेस हॅरिस,ऑनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शुट.