Devon Conway (Photo Credit - X)

England National Cricket Team vs New Zeland National Cricket Team: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका (ENG vs NZ 3rd Test 2024) खेळली जात आहे. या मालिकेत इंग्लंडने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना जिंकून आपली लाज वाचवण्याचे किवी संघाचे लक्ष्य असेल. मात्र, या सामन्यापूर्वीच किवी संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यांच्या बदलीची घोषणाही बोर्डाने केली आहे. (हे देखील वाचा: Most Wins Team in the World Test Championship: भारतीय संघाचा विक्रम मोडला, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंड पहिल्या क्रमांकावर; केला असा भीमपराक्रम)

संघासाठी ठरली नाही अपेक्षित कामगिरी

डेव्हॉन कॉनवेकडून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी अपेक्षित होती, पण त्याच्या फलंदाजीतून एकही मोठी खेळी झाली नाही. त्याने चार डावात केवळ 21 धावा केल्या होत्या. आता तो तिसऱ्या कसोटीत सामना खेळताना दिसणार नाही. डेव्हन कॉनवे लवकरच वडील होणार आहे. यामुळे तो तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी मार्क चॅपमनचा समावेश करण्यात आला आहे.

प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिली माहिती

डेव्हॉन कॉनवे तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळत नसल्याबद्दल प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले की अशा परिस्थितीत कुटुंब प्रथम येते. डेव्हॉन आणि त्याची पत्नी किम यांच्यासाठी आम्ही सर्वजण उत्साहित आहोत. मार्क चॅपमन हा नुकताच भारताविरुद्धच्या दौऱ्यात संघाचा भाग होता. याशिवाय तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने प्लंकेट शील्डमध्ये 276 धावा केल्या असून तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे.