World Test Championship: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केला आणि इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडकडून फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप आणि बेन स्टोक्स यांनी चमकदार खेळ केला. या खेळाडूंमुळेच इंग्लंडचा संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. (हे देखील वाचा: SA vs SL 2nd Test 2024 Day 5 Live Streaming: श्रीलंकेला पाचव्या दिवशी विजयासाठी 143 धावांची तर दक्षिण आफ्रिकेला 5 विकेट्सची गरज, रोमांचक स्थितीवर सामना; तुम्ही येथे पाहून घेवू शकतात मॅचचा आनंद)
भारतीय संघ राहिला मागे
न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून इंग्लंडचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला असून भारतीय संघाला मागे टाकले आहे. डब्ल्यूटीसीमध्ये इंग्लंडने आतापर्यंत एकूण 32 सामने जिंकले असून टीम इंडियाने 31 विजय आपल्या नावावर केले आहेत. इंग्लंडने भारताकडून नंबर-1चा मुकुट हिसकावून घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 29 विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंड - 32 सामने
भारत- 31 सामने
ऑस्ट्रेलिया- 29 सामने
न्यूझीलंड- 18 सामने
दक्षिण आफ्रिका - 18 सामने
पाकिस्तान- 12 सामने
WTC मध्ये इंग्लंडने सर्वाधिक सामने खेळले
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात इंग्लंडने आतापर्यंत एकूण 64 सामने खेळले आहेत, त्यापैकी 32 जिंकले आहेत आणि 24 गमावले आहेत. 8 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. इंग्लंड संघ हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला संघ आहे.
WTC 2025 च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर
WTC 2023-25 च्या गुणतालिकेत इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे. या संघाने आतापर्यंत 21 सामने खेळले आहेत, त्यापैकी 11 जिंकले आहेत आणि 9 गमावले आहेत. त्याची पीसीटी 45.24 आहे. ते अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहे. डब्ल्यूटीसीच्या आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून ही तिसरी फेरी खेळली जात आहे. पण तिन्ही वेळा इंग्लंडला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले आहे.