PC-X

Delhi Capitals Captain Meg Lanning Breaks Down in Tears: दिल्ली कॅपिटल्स संघ पुन्हा एकदा जेतेपदाच्या जवळ पोहोचला पण जिंकू शकला नाही. शनिवारी महिला प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघाला 8 धावांनी पराभव पत्करला. ज्यामुळे विजेतेपदाची त्यांची प्रतीक्षा वाढली. सलग तिसऱ्यांदा फायनल गमावल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिला अश्रू अनावर झाले आहे.

मुंबई संघाचे अभिनंदन

सामन्यानंतर बोलताना लॅनिंग म्हणाली, 'आमचा आणखी एक चांगला हंगाम गेला. पण दुर्दैवाने आम्ही जिंकू शकलो नाही. संपूर्ण हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाचे अभिनंदन. 150 धावांचा पाठलाग करणे हे आमच्यासाठी चांगले लक्ष्य होते. आमच्यासाठी आणखी एक भागीदारी पुरेशी झाली असती. पण मला संघाचा अभिमान आहे.