किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

DC vs PBKS IPL 2021 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या मोसमात आजपासून डबल हेडर (IPL Double Header) सामन्यांना सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. दोन युवा विकेटकीपर-कर्णधार, रिषभ पंत (Rishabh Pant) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. मागील सामन्यात दोन्ही संघांना पराभव पत्करावा लागला असल्यामुळे आजच्या सामन्यातून दोघे विजय पथावर परतण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. भारतीय वेळेनुसार या सामन्याला संध्याकाळी 7.30 वाजता सुरुवात होईल तर टॉस अर्धातासपूर्वी, 7.00 वाजता होईल. दिल्ली आणि पंजाब आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. (PBKS vs CSK IPL 2021: धोनीच्या सुपर किंग्सचं दणक्यात कमबॅक, पंजाब किंग्सवर 6 विकेटने केली मात)

आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 26 वेळा भिडले आहेत ज्यामध्ये पंजाब संघ वरचढ राहिला आहे. पंजाबने दिल्लीवर 15 सामन्यात तर दिल्लीने 11 वेळा पंजाबवर मात केली आहे. आजच्या सामन्यात दिल्लीकडून शिखर धवन, पृथ्वी शॉ, कर्णधार पंत आणि कगिसो रबाडा तर पंजाब संघासाठी कर्णधार राहुल, मयंक अग्रवाल, क्रिस गेल, दीपक हुड्डा यांची निर्णायक भूमिका असेल. हे सर्वांमध्ये आपल्या खेळीने सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे त्यामुळे कोणता संघ अखेरीस विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.

पंजाब किंग्ज- केएल राहुल (कॅप्टन/विकेटकिपर), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, शाहरुख खान, झे रिचर्डसन, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, रिले मेरिडथ, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, मनदीप सिंह, डेविड मालन, सरफराज खान, मोईसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, फॅबियन अ‍ॅलन, हरप्रीत ब्रार, सौरभ कुमार, प्रभिसिमरण सिंह, उत्कर्ष सिंह, ईशान पोरेल, क्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे आणि रवी बिश्नोई.

दिल्ली कॅपिटल्स- पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, अजिंक्य रहाणे, क्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, टॉम कुरन, अमित मिश्रा, अवेश खान, कगिसो रबाडा, इशांत शर्मा, उमेश यादव, स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, अक्षर पटेल, लुकमान मेरीवाला, प्रवीण दुबे, विष्णू विनोद, एम सिद्धार्थ, ललित यादव आणि रिपाल पटेल.