DC Vs CSK, IPL 2021 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आज आमने-सामने, कोण मारणार बाजी? Star Sports Network वर पाहता येणार लाईव्ह
रिषभ पंत आणि एमएस धोनी (Photo Credit: Twitter)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 50व्या सामन्यात आज (4 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Delhi Capitals Vs Chennai Super Kings) आज आमने-सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. दिल्लीच्या संघाचे नेतृत्व रिषभ पंत (Rishabh Pant) करीत आहे. तर, चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता टॉस होईल. तसेच 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यातील आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाईटवर सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. दिल्ली विरुद्ध चेन्नईच्या यांच्यातील आयपीएलचा 50वा सामना लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Disney+ Hotstar डाउनलोड करू शकतात. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाईव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे देखील वाचा- IPL 2021 Playoffs Race: कोलकाताच्या विजयाने मुंबई इंडियन्सवर प्रेशर वाढले, पण गतविजेता ‘पलटन’ लढा न देता नाही करणार पराभव स्वीकार

दिल्ली कॅपिटल्स संघ-

पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्हन स्मिथ, रिषभ पंत (कर्णधार, विकेटकिपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, अनरिक नॉर्टजे, सॅम बिलिंग्स, मार्कस स्टोइनिस, उमेश यादव, लूकमन मेरिवाला, टॉम करन, बेन द्वारशुईस, प्रवीण दुबे, विष्णू विनोद, कुलवंत खेजरोलिया, ललित यादव, रिपल पटेल, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा.

चेन्नई सुपर किंग्ज संघ-

रुतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, केएम आसिफ, जोश हेजलवूड, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहिर, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, कर्ण शर्मा, जेसन बेहरनडोर्फ, कृष्णप्पा गौथम, लुंगी एनगिडी, मिशेल सॅन्टनर, रविश्रीनिवासन साई किशोर, हरी निशांत, एन जगदीसन, हरिशंकर रेड्डी, भागवत वर्मा.