Photo Credit- X

David Warner New Milestone: पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League 2025) मध्ये डेव्हिड वॉर्नरने कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मीच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 47 चेंडूत 60 धावांची खेळी केली. सामन्यातमध्ये त्याने 8 चौकार मारले. वॉर्नरने 39 चेंडूत त्याचे पहिले पीएसएल अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, त्याच्या खेळीदरम्यान वॉर्नरने (David Warner) टी-20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो इतिहासातील सहावा फलंदाज ठरला. याशिवाय, तो टी-20 इतिहासात सर्वात जलद 13,000 धावा पूर्ण करणारा तिसरा खेळाडू ठरला. या यादीत त्याच्या आधी क्रिस गेल आहे. तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यांनी 386 डावांमध्ये हा पराक्रम केला.

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

ख्रिस गेल (2005-2025) – 455 डावांमध्ये 14,562

अ‍ॅलेक्स हेल्स (2006-2025) - 490 डावांमध्ये 13,610

शोएब मलिक (2005-2025) - 515 डावांमध्ये 13,571

किरॉन पोलार्ड (2006-2025) – 617 डावांमध्ये 13,537

विराट कोहली (2007-2025) – 390 डावांमध्ये 13,208

डेव्हिड वॉर्नर (2007-2025) - 403 डावांमध्ये 13.019

पहिले अर्धशतक ठोकण्यापूर्वी, वार्नरने 12, 0, 31 आणि 3 धावा केल्या होत्या. त्याच्या बॅटमधून मोठी खेळी झाली नव्हती. आयपीएलमध्ये वॉर्नरला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. पण बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडरला अंतिम फेरीत नेल्यानंतर तो अजूनही फ्रँचायझी सर्किटमध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहे. कराची किंग्जला त्यांचे दुसरे जेतेपद मिळवून देण्यासाठी तो उत्सुक असेल.