डॅरेन सॅमी (Photo Credit: Getty Images)

वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी (Darren Sammy) याने खुलासा केला की आयपीएलचा एक सहकारी, ज्याने त्याला 'कालू' (Kalu) नावाने संबोधित केले होते, याने त्याला "प्रेमाने कालू म्हणायचो" असे आश्वासन दिले आणि जे घडले त्याबद्दल त्याला माफी मागायची नाही. सॅमीने आयपीएलचा माजी संघ सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) सहखेळाडूंवर वर्णद्वेषाचे आरोप केले होते. इंडियन प्रीमिअर लीग (IPL) संघातील काही खेळाडू त्याला 'कालू' म्हणून संबोधायचे आणि त्याचा अर्थ वर्णद्वेषी असल्याचे आरोप सॅमीने नुकताच केला होता. त्यानंतर क्रिस गेल आणि डॅरेन ब्रावो यांनीही सॅमीला पाठिंबा दर्शवला होता. इतकेच नाही तर सॅमीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून खेळाडूंना स्वतःहून पुढे येण्याची धमकीही दिली होती आणि गुरुवारी रात्री अचानक त्याला 'कालू' शब्दाचा अर्थ उमगला असल्याचा दावा करून त्याने आरोप मागे घेतले. सॅमीला त्या नावानं सतत बोलावलं जायचं आणि सहकारी हसायचे असेही तो म्हणाला होता. (Darren Sammy Racism Row: 'काळू शब्द नेहमी वर्णद्वेषासाठी वापरला जात नाही', चाहत्याच्या ट्विटवर डॅरेन सॅमीने दिलं सडेतोड उत्तर)

त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघातील एका सदस्याने सॅमीला 'कालू'  कोणत्या अर्थाने बोलवायचे हे समजावले. सॅमीने ट्विट केलं आणि म्हणाला, "या संदर्भात मी एका व्यक्तीशी सकारात्मक चर्चा केली आणि त्याच्या उत्तरानं मी समाधानी आहे. नकारात्मकता पस्रवण्यापेक्षा लोकांना सुरक्षित करण्यावर भर द्यायला हवा. प्रेमानं 'कालू' म्हणत असल्याचे त्याने मला सांगितलं आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला."

यापूर्वी सॅमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले, “मी IPL मध्ये हैदराबाद संघाकडून खेळत असताना मला काळू या नावाने हाक मारायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मी आणि थिसारा परेरा दोघांनीही संघात काळू या नावाने संबोधलं जायचं. मला आधी वाटलं होतं की हा कुठला तरी चांगला शब्द असेल. पण त्याचा संदर्भ लागल्यावर आणि समजल्यावर मला आणखीनच दुःख झालं.”