(Photo Credit: AP/PTI Image)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडिया (Team India) ने 125 धावांनी विजय मिळवला. भारतानं दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंडिजचा संपुर्ण संघ केवळ 143 धावांवर बाद झाला. या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या वादग्रस्त विकेटने. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा फक्त 18 धावांवर बाद झाला. केमार रोच (Kemar Roach) च्या गोलंदाजीवर रोहित यष्टीरक्षक शाय होपकडे झेल देऊन बाद झाला. (ICC World Cup 2019: मोहम्मद शमी ने रचला इतिहास, जगातील सर्व गोलंदाजांना मागे टाकत विश्वकपमध्ये घेतल्या वेगवान 25 विकेट)

रोहितच्या झेलबादचे अपिल केल्यानंतर मैदानावरील पंचांनी ते फेटाळून लावलं होतं. मात्र, वेस्ट इंडिजने डीआरएस घेतला. यात तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिलं. रोहित टिव्ही रिप्लेमध्ये चेंडू बॅटला नाही तर पॅडला लागून गेल्याचं दिसत होतं. तिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजमध्ये पाहून रोहित शर्माला झेलबाद दिलं. हा निर्णय दिल्यानंतर रोहितलासुद्धा धक्का बसला. एक दिवस उलटल्यावर रोहितने आपल्या वादग्रस्तरित्या बादनंतर ट्विटरवर या बाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रोहितने ट्विटरद्वारे अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये ही सोशल मीडिया युसर्स ने अंपायरला ट्रोल केले आहे.

दरम्यान, रोहितच्या बाद झाल्यावर विराट कोहलीने के एल राहुल च्या साथीने भारताचा डाव सावरायचा प्रयत्न केला पण, राहुल जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आंही 48 धावांवर बाद झाला. सहाव्या विकेटसाठी हार्दिक पांड्या आणि एम एस धोनी यांच्या 70 विकेटच्या भागिदारीच्या जोरावर भारतानं 269 धावांपर्यंत मजल मारली.