CSK vs RR, IPL 2019 Live Cricket Streaming पहा 'हॉटस्टार' वर; टॉस जिंकत 'राजस्थान रॉयल्स' चा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
CSK VS RR (File Photo)

चैन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (M. A. Chidambaram Stadium) आज राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध चैन्नई सुपरकिंगचा  (CSK)सामना रंगतो आहे. टॉस जिंकत राजस्थान रॉयलसच्या अजिंक्य रहाणेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चैन्नई आज होम पिचवर खेळत असली तरीही या संघाची सुरुवात खराब झाली आहे. चैन्नईने त्यांच्या संघात हरभजन सिंह ऐवजी आज मिशेल सेंटनर या खेळाडूला संधी दिली आहे. तर राजस्थान रॉयल्सच्या संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. IPL 2019 Full Schedule: 23 मार्च ते 5 मे दरम्यान रंगणार्‍या VIVO IPL 12 चे वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा; जाणून घ्या कधी, कुठे रंगणार आयपीएलचे सामने

राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस 

चैन्नई यापूर्वी दोन्ही सामने जिंकला आहे तर राजस्थान दोन्ही सामने हरला आहे. त्यामुळे आज राजस्थानकडून सामन्यावर पकड मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील.तुम्हांला आजचा हा सामना टीव्हीवर आणि त्याच्या शोभातैनेच हॉटस्टारवर लाईव्ह पाहण्याची सोय आहे.ऑनलाईन सामना पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर मराठीत या सामन्याची लाईव्ह कॉमेंट्री स्टार प्रवाह वर सुरु आहे.

टीम:

राजस्थान रॉयल्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टीव स्मिथ, जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफरा आर्चर, संजू सैमसन, राहुल त्रिपाठी, कृष्णप्पा गौतम, जयदेव उनादकट, धवल कुलकर्णी, श्रेयस गोपाल.

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिह धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, शेन वाटसन, सुरेश रैना, केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वैन ब्रावो, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, मिशेल सेंटनर, इमरान ताहिर.

राजस्थान विरुद्ध चैन्नईचा आजचा सामना चुरशीचा होणार आहे.