चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

CSK vs RCB, IPL 2020: एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) महामुकाबला होणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी (RCB) कर्णधार कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी आरसीबी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत. विराटची आरसीबी पाचव्या तर धोनीचे सुपर किंग्स सहाव्या स्थानावर आहे. आजचा चेन्नई आणि बेंगलोर यांच्यातील महा मुकाबला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांना गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स गुणतालिकेतील आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. (CSK vs RCB, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आव्हान; विराट कोहली, एमएस धोनीची 'या' नवीन विक्रमांवर नजर)

सीएसके प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला असून केदार जाधवच्या जागी एन जगदीशनला सामील करण्यात आले आहेत.  सीएसकेकडून फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनची जोडी सलामीला येतील. तर मध्यक्रमात अंबाती रायडू, धोनी, एन जगदीशन, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, सॅम कुरन जबाबदारी सांभाळतील. गोलंदाजीची धुरा शार्दुल ठाकूर, दिपक चाहर व कर्ण शर्मा यांच्याकडे असेल. दुसरीकडे, आरसीबीने प्लेइंग इलेव्हनमध्ये मोईन अलीच्या जागी क्रिस मॉरिस आणि गुरकिरात मानला मोहम्मद सिराजच्या जागी संधी मिळाली आहे. आरोन फिंच आणि देवदत्त पडिक्कलची जोडी डावाची सुरुवात करतील. विराट कोहली तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. एबी डिव्हिलियर्स, क्रिस मॉरिस, गुरकीरत मान मधल्या फळीत दिसतील. वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि इसुरु उडाणा गोलंदाजीची धुरा सांभाळतील.

पाहा सीएसके आणि आरसीबीचे प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स: फाफ डुप्लेसीस, शेन वॉटसन, अंबाती रायडू, एमएस धोनी, एन जगदीशन, ड्वेन ब्रावो, रविंद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर आणि कर्ण शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: आरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, क्रिस मॉरिस, गुरकीरत मान, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि इसुरु उडाणा.