इंडियन प्रीमियर लीग (Indiana Premier League) 2020च्या 25व्या सामन्यात सध्या भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी चेहरे विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) आज आमने-सामने येतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) कर्णधार अनुक्रमे कोहली आणि धोनी दोघेही नवीन विक्रमांचा पाठलाग करताना दिसतील. धोनीला या हंगामात आपल्या संबंधित फ्रँचायझीसाठी आवडतील इतकी प्रभावी कामगिरी बजावता आली नाही. प्ले-ऑफ गाठण्यासाठी सीएसकेचे (CSK) पात्र ठरणे कठीण दिसत असून आरसीबी (RCB) प्लेऑफमधील स्पॉटसाठी चांगले दावेदार आहेत. कोहली आणि धोनी या दोघांचेही मूळ उद्दीष्ट आपापल्या टीमला सामना जिंकवून देणे असले तरी काही मोठ्या वैयक्तिक विक्रमसाठीही दोघे रिंगणात उतरतील. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 100 कॅच पूर्ण करण्यापासून धोनी फक्त दोन कॅच दूर आहे. शिवाय, टी-20 लीगमध्ये 150 डिसमिसल्स करण्यापासून तो केवळ 3 डिसमिसल्स दूर आहे. यावर्षी आरसीबी फलंदाज युनिटने दाखवलेली विसंगती लक्षात घेता धोनीने यंदा हे सर्व टप्पे गाठणे कठीण दिसत आहे. (IPL 2020: एमएस धोनीच्या CSKविरुद्ध लढतीसाठी RCB कर्णधार विराट कोहली उत्सुक, शेअर केली खास पोस्ट See Tweet)
दुसरीकडे, आरसीबी कर्णधार विराटने शेवटच्या दोन सामन्यात नाबाद 72 आणि 43 धावा केल्या आहेत. सीएसकेच्या विरोधात, 31 वर्षीय विराटने आणखी 7 षटकार ठोकले तर तो टी-20 लीगमध्ये 200 षटकारांचा टप्पा गाठेल. असे केल्या कोहली एलिटच्या यादीत सामील होऊ शकतो. रोहित शर्मा आणि धोनीनंतर तो आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरेल. एकूणच क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, धोनी आणि रोहितनंतर हा महत्त्वाचा टप्पा गाठणारा तो पाचवा फलंदाज असेल. सीएसके आणि आरसीबी यांच्यातील आयपीएल लढाईचे चाहत्यांमध्ये एक विशेष महत्व आहे. जगभरातील क्रीडा संघांमधील काही अत्यंत लढाईंप्रमाणे बेंगलोर आणि चेन्नई सामना देखील चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण करतो.
दुसरीकडे, दोन फ्रॅन्चायझी आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये एकमेकांबद्दल असलेला आदर 'सदर्न डर्बी'मधील लढाईला खास बनवते. शनिवारी कोहली आणि धोनी पुन्हा एकदा एकत्र येतील तेव्हा युएईमध्ये दोन्ही चाहत्यांना टीममधील शानदार क्रिकेटचा खेळ पाहायला मिळेल. सीएसके आणि आरसीबी यांच्यातील आजचा आयपीएल सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.