IPL 2020: एमएस धोनीच्या CSKविरुद्ध लढतीसाठी RCB कर्णधार विराट कोहली उत्सुक,  शेअर केली खास पोस्ट (See Tweet)
धोनीच्या CSKविरुद्ध लढतीसाठी RCB कर्णधार विराट कोहली उत्सुक (Photo Credit: Twitter/PTI)

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) आयपीएलमध्ये (IPL) अनेक काळ संघर्ष करावा लागला आहे. 2016ची आवृत्ती वगळता आरसीबी (RCB) प्लेऑफ गाठण्यात अपयशी ठरली. दरम्यान, सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलमध्ये कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने पाचपैकी तीन विजयांसह चांगली सुरुवात केली आहे. मात्र, त्यांचा पुढील सामना एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होईल जिथे जी त्यांची खरी परीक्षा असेल. आरसीबीसमोर शनिवार, 10 ऑक्टोबर रोजी सीएसकेविरुद्ध (CSK) लढतीसाठी मैदानावर उतरतील जो आयपीएलमधील सर्वात मोठ्या लढतींपेक्षा एक असेल. कोहली, धोनी, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्राव्हो, युझवेंद्र चहल यांचा शनिवारी आमना-सामना होईल. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कोहली आणि धोनी एकमेकांविरुद्ध येण्याची ही पहिलीच घटना असेल. आणि बहुप्रतिक्षित लढतीपूर्वी कोहलीने एक रंजक पोस्ट शेअर केली. (Most Dangerous Celebrity to Search Online in India: सावधान! क्रिस्टियानो रोनाल्डो, एमएस धोनी सर्वात खतरनाक सेलिब्रिटी; इंटरनेटवर नाव सर्च करणं पडेल महागात)

कोहलीने असे काही लिहिले नाही, पण त्याने एका घड्याळाचे ईमोजी आणि हेल्मट ऑन आरसीबी जर्सीमधील फोटो शेअर केला. या फोटोवरून आरसीबी कर्णधार सीएसकेविरुद्ध आगामी लढतीसाठी सज्ज असल्याचे दिसत आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने सहा पैकी दोन सामने जिंकले आणि चार गमावले आहेत. दुसरीकडे, आरसीबी संघाने पाच पैकी तीन सामने जिंकले आणि दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. पाहा त्याची पोस्ट:

सीएसके आणि आरसीबीच्या लढतीबाबत बोलायचे झाले तर 'येलो आर्मी'चा विराट सेनेवर वरचष्मा आहे. दोन्ही आजवर 24 सामन्यात आमने-सामने आले ज्यातील 15 सामन्यात सीएसकेने तर 8 सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. 1 सामना अनिर्णित राहिला. तथापि, सध्याचा फॉर्म आरसीबीच्या बाजूने समीकरण झुकवत आहे जात धोनी आणि टीमपेक्षा काही पटींनी चांगला दिसत आहे. गुणतालिकेत आरसीबी पाचव्या तर सीएसके सहाव्या स्थानावर आहे. पण एकंदरीत, हे शनिवारी संध्याकाळी आरसीबी आणि सीएसके यांच्यातील लढत रंगतदार ठरेल हे नक्की.