CSK Vs RCB, IPL 1st Match: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामासाठी स्टेज तयार झाला आहे. सर्व संघांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दरम्यान, पहिला सामना आज म्हणजेच 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा हाय व्होल्टेज सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. आयपीएल सुरू होण्याच्या एक दिवस आधी एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले. आता चेन्नई सुपर किंग्जची कमान ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आत्तापर्यंत सीएसकेच्या ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजावलेला गायकवाड आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये सीएसके संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचवेळी आरसीबीची कमान फाफ डू प्लेसिसच्या हाती असेल.
हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जने 20 सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने 10 सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे नशीब जड असल्याचे दिसत आहे.
एकूण सामने- 31
चेन्नई सुपर किंग्ज जिंकले- 20
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विजयी- 10
अनिर्णायक- 1
आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
सीएसकेचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेला आयपीएलमध्ये 100 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी चार षटकारांची गरज आहे.
सीएसकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आयपीएलमध्ये 100 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी एका षटकाराची गरज आहे.
सीएसकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण करण्यासाठी तीन झेलांची गरज आहे.
सीएसकेचा स्टार फलंदाज एमएस धोनीला आयपीएलमध्ये 350 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी एका चौकाराची गरज आहे.
सीएसकेचा चा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला टी-20 क्रिकेटमध्ये 100 झेल पूर्ण करण्यासाठी एका झेलची गरज आहे.
सीएसकेचा स्टार अष्टपैलू डॅरिल मिशेलला टी-20 क्रिकेटमध्ये 100 झेल पूर्ण करण्यासाठी आणखी तीन झेल हवे आहेत.
टी-20 मध्ये 150 बळींचा टप्पा गाठण्यासाठी महेश थेक्षाना आणखी दोन विकेट्सची गरज आहे.
सीएसकेचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेला आयपीएलमध्ये 4500 धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी शंभर धावांची गरज आहे.
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसला आयपीएलमध्ये 150 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी पाच षटकारांची गरज आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला 12 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी आणखी सहा धावांची गरज आहे.
आरसीबीचा स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला आयपीएलमध्ये 50 झेल गाठण्यासाठी आणखी सहा झेलांची गरज आहे.