CSK vs KKR, IPL 2020: नितीश राणाचे दमदार अर्धशतक, KKRचे चेन्नई सुपर किंग्सला 173 धावांचे टार्गेट
नितीश राणा, सीएसके विरुद्ध केकेआर (Photo Credit: PTI)

CSK vs KKR, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 49व्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) 20 ओव्हरयामध्ये 5 विकेट गमावून नितीश राणाच्या (Nitish Rana) दमदार अर्धशतकाच्या बळावर धावांपर्यंत 172 मजल मारली आणि सीएसकेला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य दिले. सीएसकेविरुद्ध (CSK) आजच्या सामन्यात केकेआरला (KKR) विजयाची गरज असताना नाईट रायडर्सकडून सलामीला आलेल्या नितीश राणाने दमदार अर्धशतक ठोकले आणि सर्वाधिक 87 धावा केल्या. नितीशऐवजी सलामी जोडीदार शुभमन गिलने 26 धावांचे योगदान दिले. कर्णधार इयन मॉर्गनने 15 धावा तर माजी कर्णधार दिनेश कार्तिकने नाबाद 21 धावा केल्या. दुसरीकडे, सीएसकेसाठी गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण पुढे प्रभावी सुरुवातीचा फायदा घेऊ शकले नाही. सुपर किंग्ससाठी लुंगी एनगीडीने (Lungi Ngidi) 2 तर मिशेल सॅटनर, रवींद्र जडेजा आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (CSK vs KKR, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; सीएसके-केकेआर Playing XIमध्ये झाले मोठे बदल)

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी कोलकाता संघासाठी सावध सुरुवात केली. पहिल्या 7 ओव्हरमध्ये दोघांनी 52 धावा केल्या. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली असताना कर्ण शर्माने शुभमनला बोल्ड करून संघाला पहिले यश मिळवून दिले. सुनील नारायणला आजच्या सामन्यासाठी फलंदाजी क्रमवारीत बढती मिळाली, पण तो त्याचा फायदा करून घेऊ शकला नाही आणि 7 धावा करून माघारी परतला. त्यानंतर फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू सिंह देखील जडेजाच्या चेंडूवर 11 धावांवर अंबाती रायुडूकडे झेलबाद झाला. यानंतर नितीश राणाने 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. नितीशने आपल्या डावात 10 चौकार आणि 4 षटकार ठोकले. नितीश यंदा शतकी खेळी करेल असे वाटत असताना एनगीडीने त्याला 87 धावांवर सॅम कुरनकडे कॅच आऊट केले. अखेर कर्णधार मॉर्गन आणि माजी कर्णधार दिनेश कार्तिकने केकेआरला सीएसकेसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

यापूर्वी, आजच्या सामन्यासाठी सीएसकेने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले तर केकेआरकडून एक बडा झाला. फाफ डुप्लेसिस, इमरान ताहिर आणि मोनू कुमार यांना डच्चू दिला असून त्यांच्या जागी शेन वॉटसन, लुंगी एनगीडी आणि कर्ण शर्माचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे, केकेआरने प्रसिद्ध कृष्णाऐवजी रिंकू सिंहला संधी दिली आहे.