CSK vs KKR, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्सने टॉस जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय; सीएसके-केकेआर Playing XIमध्ये झाले मोठे बदल
चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

CSK vs KKR, IPL 2020: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात आयपीएलचा (IPL) 49वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होईल. आजच्या सामन्यात सीएसके (CSK) कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. आजच्या सामन्यात केकेआरसमोर (KKR) प्ले ऑफ शर्यतीत कायम राहण्याचे आव्हान असेल तर सीएसके पराभवाची परतफेड करू पाहत असेल. प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेला सीएसके संघ आता इतर संघांची समीकरणं बिघडवण्याच्या प्रयत्नात असेल, तर केकेआरसाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. केकेआरने यापूर्वी सीएसकेविरुद्ध साखळी सामन्यात विजय मिळवला होता. (IPL 2020 Qualifier: पॉईंट्स टेबलमध्ये 16 गुण असूनही मुंबई इंडियन्सला प्ले ऑफचं तिकीट नाही; तर DC, RCB साठीही दिल्ली अभी दूर है!)

आरसीबीविरुद्ध मागील सामन्यात विजयानंतर सीएसकेने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केलेला नाही.  मोनू सिंह, फाफ डु प्लेसिस आणि इमरान ताहीर यांच्या जागी शेन वॉट्सन, लुंगी एनगीडी आणि कर्ण शर्माचा समावेश केला आहे. दुसरीकडे, केकेआरने आजच्या सामन्यासाठी एक बदक करून रिंकू सिंहला प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संधी दिली आहे. केकेआरने आजच्या सामन्यात पुन्हा एकदा आंद्रे रसेलला संधी दिलेली नाही. केकेआरने 12 सामन्यात 12 गुणांची नोंद केली आहे तर सीएसके पॉईंट्स टेबलच्या तळाशी आहेत.

पाहा सीएसके आणि केकेआर प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स: एमएस धोनी (कॅप्टन), अंबाती रायुडू, शेन वॉट्सन, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, लुंगी एनगीडी, मिशेल सॅटनर , सॅम कुरन, एन जगदीशन, कर्ण शर्मा आणि रुतुराज गायकवाड.

कोलकाता नाईट रायडर्स: इयन मॉर्गन (कॅप्टन), शुभमन गिल, नितीश राणा, रिंकू सिंह, राहुल त्रिपाठी, लोकी फर्ग्युसन, सुनील नारायण, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती.